अनुज बिडवेच्या खुन्यास जन्मठेप
पुण्यातील विद्यार्थी अनुज बिडवे याचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी ब्रिटिश विद्यार्थी कियारन स्टेपलटन याला न्यायालयाने दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कियारनला काल न्यायालयाने दोषी ठरवले होते.
Jul 27, 2012, 11:40 PM ISTअनुज बिडवेला 'लँकस्टायर'ची आदरांजली
इंग्लंडमधल्या लँकस्टायर विद्यापीठानं अनुज बिडवेच्या नावानं शिष्यवृत्ती सुरु केलीय. पुणे विद्यापीठात या शिष्यवृत्तीची घोषणा आज करण्यात आली. त्यावेळी अनुजचे पालक उपस्थित होते.
Jun 8, 2012, 11:41 PM ISTअनुज बिडवेच्या स्मरणार्थ लँकास्टरची शिष्यवृत्ती
अनुज बिडवेच्या स्मरणार्थ लँकास्टर विद्यापीठ शिष्यवृत्ती सुरु करणार आहे. अनुज सारख्या गुणवान विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे तो कायम आठवणीत राहील असं लँकास्टर विद्यापीठाचे व्हाईस चॅन्सलर प्रोफेसर मार्क इ. स्मिथ यांनी म्हटलं आहे.
Feb 5, 2012, 08:24 AM ISTअनुजच्या कुटुंबियांची मृतदेहासाठी धडपड
अनुजचा मृतदेह मिळवण्यासाठी कुटुंबियांना झगडावं लागतंय. अनुजचा मृतदेह लवकरात लवकर मिळवण्यासाठी भारतीय उच्चायुक्तानं प्रयत्न करावेत अशी मागणी अनुजच्या कुटुंबियांनी केलीय.
Jan 3, 2012, 11:46 PM ISTअनुजचे मारेकरी ताब्यात?
अनुजची मँचेस्टरमधील काही माथेफिरूंनी गेल्या रविवारी हत्या केली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी एक १९ वर्षीय आणि एक २० वर्षीय युवकांना संशयावरून अटक केली होती. यातील १९ वर्षीय युवकाला जामीन मिळाला असला तरी २० वर्षीय युवक पोलिसांच्या ताब्यात आहे.
Jan 2, 2012, 11:27 AM ISTब्रिटनमध्ये वर्णद्वेषातून भारतीय तरूणाची हत्या
ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या पुणेकर विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुज बिडवे असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे अनुजची हत्या वर्णद्वेषातून झाल्याचा संशय आहे.
Dec 28, 2011, 05:41 PM IST