IND vs ZIM : विजयानंतरही कॅप्टन केएल नाराज, दुसऱ्या सामन्यातून हा खेळाडू 'आऊट'

टीम इंडियाने पहिल्या वनडेत (IND vs ZIM) झिंबाब्वेचा 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला.  

Updated: Aug 19, 2022, 10:05 PM IST
 IND vs ZIM : विजयानंतरही कॅप्टन केएल नाराज, दुसऱ्या सामन्यातून हा खेळाडू 'आऊट' title=

हरारे :  टीम इंडियाने पहिल्या वनडेत (IND vs ZIM) झिंबाब्वेचा 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या (Team India) सर्वच खेळाडूंनी या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं, अपवाद एका खेळाडूचा. या खेळाडूच्या कामगिरीमुशळे कॅप्टन केएल नाराज आहे. त्यामुळे 20 ऑगस्टला होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात या खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. (zim vs ind 2nd odi team india captain k l rahul may be drop to prasidh krishna)

टीममधून बाहेर होणार हा खेळाडू?

झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र त्याने निराशा केली. प्रसिद्धने इंग्लंड आणि विंडिज विरुद्धही फारशी चांगली कामगिरी केली नव्हती.  प्रसिद्धने विकेट्स जरुर घेतल्या. मात्र त्याला धावांवर अंकुश घालण्यात यश आलं नाही.

विंडिज विरुद्धच्या मालिकेत प्रसिद्धची धुलाई करण्यात आली. त्यामुळे प्रसिद्धला झिंबाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळू शकतो. त्याच्या जागी आवेश खानला संधी मिळू शकते.