धक्कादायक! T 20 World cup आधी या खेळाडूचं स्पॉट फिक्सिंगप्रकरणी निलंबन

ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Updated: Oct 14, 2021, 10:50 PM IST
धक्कादायक! T 20 World cup आधी या खेळाडूचं स्पॉट फिक्सिंगप्रकरणी निलंबन title=

इस्लामाबाद : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World cup 2021) अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानकडून 2016 च्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत  (U 19 World Cup 2016) खेळलेला फलंदाज जीशान मलिकला (Zeeshan Malik) स्पॉट फिक्सिंगप्रकरणी (Spot Fixing)  तातपुरतं निलंबित करण्यात आलं आहे. पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी नॅशनल टी 20 चॅम्पियनशीप स्पर्धेचं (National T20 Championship) आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जीशानवर स्पॉट फिक्सिंग केल्याचे आरोप होते. या प्रकरणी त्याचं निलंबन करण्यात आलं. पीसीबीने (PCB)  ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Zeeshan Malik suspended under PCB Anti Corruption Code)  

क्रिकेटपासून केव्हापर्यंत दूर राहणार?

जीशान मलिक पीसीबी अंतर्गत येणाऱ्या उत्तर क्रिकेट संघाकडून खेळतो. जीशानवर भष्ट्राचार विरोधी नियमांच्या 4.7.1. अनुच्छेदांनुसार ही तातपुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा, की जेव्हापर्यंत या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही, तोवर जीशानला क्रिकेटच्या कोणत्याही घडामोडीत सहभागी होता येणार नाही.  

दरम्यान पीसीबीच्या सू्त्राने दिलेल्या माहितीनुसार, भ्रष्टाचार विरोधी पथक जीशानला म्पियनशिप सामन्यांदरम्यान स्पॉट-फिक्सिंगच्या देण्यात आलेल्या ऑफरच्या घटनेची चौकशी करत आहे.