Yuzvendra Chahal : मी रोज रात्री तुला...; धनश्रीसोडून कोणाला प्रपोज करतोय युझी? व्हायरल व्हिडीओने खळबळ

टीम इंडियाचा आणि राजस्थान रॉयल्सच्या टीमचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एका व्यक्तीला प्रपोज केलं आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Apr 21, 2023, 04:20 PM IST
Yuzvendra Chahal : मी रोज रात्री तुला...; धनश्रीसोडून कोणाला प्रपोज करतोय युझी? व्हायरल व्हिडीओने खळबळ title=

Yuzvendra Chahal proposes Jos Buttler: यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) एकापेक्षा एक सामने रोमांचक होताना दिसतायत. इतकंच नव्हे तर आयपीएल दरम्यान घडणारे किस्से देखील फार मजेशीर असतात. असाच नुकताच एक किस्सा राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) टीममध्ये घडला आहे. टीम इंडियाचा आणि राजस्थान रॉयल्सच्या टीमचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एका व्यक्तीला प्रपोज केलं आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

चहलने कोणाला केलं प्रपोज?

राजस्थान रॉयल्सच्या टीममधील जॉस बटलर (Jos Buttler) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्या मैत्रीबद्दल सर्वांना ठाऊक आहे. दरम्यान याच दोन खेळाडूंचा आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहलने जॉस बटलरला प्रपोज केलं आहे. 

गुडघ्यावर बसून केलं प्रपोज

बटलर आणि चहल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये चहल गुडघ्यावर बसून बटलरला प्रपोज करताना दिसतोय. 

या व्हिडीओमध्ये गुडघ्यावर बसून चहल म्हणतो की, जॉस भाई, तु माझं प्रेम आहेस...गेल्या वर्षी जेव्हा आपण भेटलोस तेव्हा माझं हृदय युजी युजी असं धडधडू लागलं. मी दररोज रात्री तुला पाहतो आणि तुला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तू माझ्यासोबत डेटवर येशील का?

युझवेंद्र चहलच्या समोर उभ्या असलेल्या बटवरच्या कडेवर एक छोटी मुलगी देखील य व्हिडीओमध्ये दिसतेय. यावेळी चहलचा हात पकडून बटलर त्याला उभं रहायला सांगतो आणि त्याला म्हणतो, हो मी नक्कीच येणार. या दोघांचाही हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना फारच आवडला आहे. चाहते यावर विविध कमेंट करताना दिसतायत.

राजस्थान रॉयल्सच्या टीमसाठी यंदाचा सिझन फार चांगला सुरु असल्याचं दिसतंय. आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये विजय नोंदवत राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे युझवेंद्रने 6 सामन्यामध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसरीकडे जॉस बटलरनेही तुफान फलंदाजी केलीये. त्याने 6 सामन्यात 146.99 च्या स्ट्राइक रेटने 244 रन्स केले आहेत.