मुंबई : आयपीएलच्या 11 व्या सीजनला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील प्रत्येक खेळाडुला 'यो यो टेस्ट'मध्ये पास होणं गरजेच आहे. या टेस्टमध्ये खेळाडू जर नापास झाला तर त्याला आयपीएल टीममधून बाहेर राहावं लागेल.
बीसीसीआयचा हा नियम जवळपास आयपीएलमधून अनेक संघांनी लागू केला आहे. मुंबई इंडियंस, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, किंग्स इलेवन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांनी हा नियम आधीच लागू केला आहे. या टेस्टमध्ये युवराज आणि रैना सारखे खेळाडू देखील फेल झाल्याने त्यांना संघातून बाहेर बसावं लागलं होतं.
किंग्स इलेवन पंजाबने ही टेस्ट आता मॅन्डेटरी केली आहे. अशातच जर युवराज सिंग आणि क्रिस गेल सारखे खेळाडू या टेस्टमध्ये फेल झाले तर त्यांना टीममध्ये स्थान नाही मिळणार. आता हे पाहावं लागेल की टीममध्ये यांना जागा मिळते की नाही.
कोणत्याही दौऱ्यासाठीच्या संघनिवडीदरम्यान टीम मॅनेजमेंटकडून क्रिकेटर्सची यो-यो फिटनेस टेस्ट घेतली जाते. या फिटनेस टेस्टमध्ये पास झालेल्या क्रिकेटर्सनाही संघात स्थान दिले जाते. केवळ बीसीसीआयच नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडूनही ही टेस्ट घेतली जाते.
बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंनी या टेस्टमध्ये पास होण्यासाठी १९.५ गुण मिळवणे गरजेचे असते. त्याखालील गुण मिळवणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान दिले जात नाही. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटर्ससाठी ही एक मोठी परीक्षाच असते. यात काही टेस्टचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ रन बिटवीन द लाईन्स सारख्या टेस्ट घेतल्या जातात.
केवळ क्रिकेटच नव्हे तर फुटबॉल आणि हॉकीच्या खेळाडूंचीही अशाच प्रकारे टेस्ट होते.