ऑकलंड : टीम इंडियाला (Team India) महिला वर्ल्ड कपमध्ये (Womens World Cup) सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. रंगतदार झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia Womens) टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा या पराभवामुळे सेमी फायनलचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. (wwc 2022 iw vs aw australia womens cricket team beat india womens by 6 wickets at eden park auckland)
ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
ऑस्ट्रेलियन टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा हा निर्णय योग्य ठरला. टीम इंडियाने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 28 धावांतच दोन्ही ओपनर आऊट झाले. स्मृती मानधना 10 आणि शेफाली वर्मा 12 धावा करुन माघारी परतल्या. त्यानंतर कॅप्टन मिताली राजने 68 आणि यास्तिका भाटिया 59 धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या 130 धावांच्या पार्टनरशीपमुळे टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केलं.
या दोघी आऊट झाल्या. त्यानंतर हरमनप्रीत टीम इंडियाचा डाव सावरला. हरमनप्रीतने 47 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. हरमनप्रीतने एक बाजू लावून धरली. तर दुसऱ्या बाजूला ऋचा घोष 8 धावा करुन आऊट झाली. तर स्नेह राणाला भोपळाही फोडता आला नाही. पूजा वस्त्राकर 9व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आली. पूजाने हरमनप्रीतला चांगली साथ दिली. पूजाने 28 चेंडूत 34 धावांची अप्रतिम खेळी केली.
ऑस्ट्रेलियाचा यशस्वी पाठलाग
ऑस्ट्रेलियाने 278 विजयी धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीने 121 धावांची भागीदारी केली. ओपनर रचेल हायनस ने 43 तर एलिसा हिलीने 72 धावांची खेळी केली. यानंतर कॅप्टन मेग लेनिंगने 97 धावांचं योगदान दिलं. तर एलिसी पेरीने 28 धावांचं योगदान दिलं.
ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्स गेल्याने टीम इंडियाच्या विजयाच्या आशा कायम राहिल्या. मात्र बेथ मूनीने 20 चेंडूत 30 धावा करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजून झुकवला. ऑस्ट्रेलियाने 3 चेंडूआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाकडून पूजाने 2 आणि मेघना सिंह आणि स्नेह राणाने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
टीम इंडिया : स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, मिताली राज (कॅप्टन), हरमनप्रीत कौर, स्नेह राणा, ऋचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्रकर, झूलन गोस्वामी, मेघना सिंह आणि राजेश्वरी गायकवाड.
टीम ऑस्ट्रेलिया : एलिसा हीली (विकेटकीपर), रॅचल हेन्स, मेग लॅनिंग (कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्राथ, एशले गार्डनर, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शट्ट आणि डार्सी ब्राउन.