WTC: टीम इंडियाच्या पराभवावर सचिन तेंडुलकर याचे मोठे विधान, पाहा कोण जबाबदार?

 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या पराभवाचे खापर ...

Updated: Jun 24, 2021, 04:40 PM IST
 WTC: टीम इंडियाच्या पराभवावर सचिन तेंडुलकर याचे मोठे विधान, पाहा कोण जबाबदार? title=
संग्रहित छाया

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या पराभवाचे खापर कर्णधार विराट कोहली याने पावसावर फोडले होते. मात्र, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने विराट यालाच जबाबदार धरले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारताने 8 विकेटने गमावला. तेव्हापासून क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. त्यांच्याकडून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. आता त्यातच क्रिकेट तज्ज्ञांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाने हा सामना गमवल्यानंतर कोण जबाबदार आहे, याची चर्चा होऊ लागले. तर विराट कोहली याने पराभवाचे खापर चक्क पावसावर फोडले. तर दिग्गज खेडाळू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांने पराभवाचे कारण सांगितले आहे.

सचिन तेंडुलकर यांचे मोठे विधान

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) दोन षटकांत गमावल्यानंतर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गमावली, असे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने म्हटले आहे. तो पुढे म्हणाला, ब्लॅककॅप्स म्हणून ओळखला जाणारा न्यूझीलंड हा एक चांगला संघ होता.

सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटर अकाउंटवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल ब्लॅक कॅप्सचे अभिनंदन करत पोस्ट केली आहे. आपली टीम एकदम चांगली आहे.सचिनने पुढे लिहिले की, 'टीम इंडिया त्याच्या कामगिरीमुळे निराश होईल. मी म्हटल्याप्रमाणे पहिले 10 षटके निर्णायक ठरतील आणि भारताने कोहली आणि  पुजारा या दोघांनाही 10 चेंडूत गमवावे लागले आणि त्यामुळे टीम इंडियावर मोठा दबाव निर्माण झाला.विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा दोघांनाही वेगवान गोलंदाज काइल जॅमीसन याने बाद केले. सहाव्या दिवशी साऊथॅम्प्टन खेळपट्टी अधिक वेगवान झाली आणि चेंडू अधिक बाऊन्सही होत होते. कोहली 35 व्या षटकांच्या पाचव्या बॉलवर आऊट झाला तर पुजारा 37 व्या षटकांच्या तिसऱ्या चेंडूवर बाद झाला.

टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावताना दुसर्‍या डावात 170 धावा केल्या तरी टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर सामना जिंकण्यासाठी 139 धावांचे छोटे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह न्यूझीलंड टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ठरली.