WTC Final: भारत और ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळवण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये 480 रन्स केले. यानंतर टीम इंडिया फलंदाजीला उतरून तिसऱ्या दिवसाच्या शेवटी 3 विकेट्स गमावून 289 रन्सवर खेळतेय. कांगारूंपेक्षा टीम इंडिया अजून 191 रन्सने मागे आहे. मात्र आता भारतीय चाहत्यांना एकच प्रश्न आहे, तो म्हणजे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठणार कशी?
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टेस्ट सामन्याचा निकाल लागणं कठीण आहे. चौथी टेस्ट ड्रॉ झाली तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचू शकेल का? हा प्रश्न अजूनही कायम आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ड्रॉ झाला तर अंतिम समीकरण कसं असेल ते जाणून घेऊया.
टीम इंडिया जर अहमदाबाद टेस्ट सामना जिंकू शकली तर अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. जर चौथ्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला किंवा टेस्ट ड्रॉ झाली तर श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली टेस्ट सिरीजच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. न्यूझीलंडची टीम श्रीलंकेविरुद्ध एखादा सामना जिंकली किंवा ड्रॉ झाला तर भारतासाठी ती आनंदाची बाब असेल.
जर श्रीलंकेची टीम न्यूझीलंडविरुद्धची पहिली टेस्ट मॅच जिंकली आणि दुसरीकडे अहमदाबादमध्ये भारताला विजय मिळवता आला नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित रंजक होईल. अशा परिस्थितीत श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी दुसरी टेस्ट मॅच निर्णायक ठरणार आहे. जर हा सामना श्रीलंका हरली, तर टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दरवाजे खुले होतील.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून टीम इंडिया 2-1 अशी आघाडीवर आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या टीमने या विजयासह फायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आता 68.52 पॉईंट्स झाले आहेत.
भारताव्यतिरिक्त श्रीलंकेच्या टीमला देखील अजूनही अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी आहे. या महिन्यामध्ये टीमला न्यूझीलंडच्या भूमीवर 2 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळावायची आहे. श्रीलंकेने ही सिरीज 2-0 ने जिंकली तर त्यांना फायलनचं तिकीट मिळू शकणार आहे. मात्र न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये न्यूझीलंडच्या टीमचं पारडं जड मानलं जातंय.