WTC Final 2021 | मैदानात उतरताच कॅप्टनचा 'विराट' कारनामा, ठरला पहिला भारतीय

टॉससाठी मैदानात उतरताच टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Captain Virat Kohli) कारनामा केला आहे.

Updated: Jun 19, 2021, 03:35 PM IST
WTC Final 2021 | मैदानात उतरताच कॅप्टनचा 'विराट' कारनामा, ठरला पहिला भारतीय   title=

साऊथम्प्टन : मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम (World Test Championship Final 2021) सामन्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमन्सनने (Kane Williamson) टॉस जिंकला आहे. केनने नाणेफेक जिंकत पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. दरम्यान टॉससाठी मैदानात उतरताच टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Captain Virat Kohli) कारनामा केला आहे. विराट माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra singh Dhoni) पछाडत भारताचे सर्वाधिक कसोटींमध्ये (Most Matches As A Captain) नेतृत्व करणारा कर्णधार ठरला आहे. (wtc final 2021 virat kohli become first indian captain who lead team india in most test matches) 

विराटचा न्यूझीलंड विरुद्धचा कर्णधार म्हणून 61 वा सामना आहे. तर महेंद्रसिंह धोनीने 60 टेस्टमध्ये टीम इंडियाची कॅपटन्सी केली आहे. विराटला हा विक्रम इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर असताना करण्याची संधी होती. पण विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पहिल्या कसोटीनंतर माघार घेतली होती. त्यामुळे विराटला या महामुकाबल्यापर्यंत वाट पाहावी लागली.

विराटची नेतृत्वातील कामगिरी

विराटने आतापर्यंत 60 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या 60 पैकी 36 सामन्यांमध्ये विराटने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिला आहे. तर केवळ 14 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तर विराटला 10 मॅच अनिर्णित राखण्यास यश आले आहे. विराटने आपल्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाला सलग 9 वेळा सीरिज जिंकवून देण्याचा पराक्रम केला आहे.

टेस्ट क्रिकेटचा किंग कोण?

या महामुकाबल्यात क्रिकेट जगातला टेस्ट क्रिकेटचा किंग मिळणार आहे. दोन्ही संघ अंजिक्यपदासाठी एक पाऊल दूर आहे. मात्र एकच संघ हा विजयी ठरणार आहे. दरम्यान विराटला या सामन्यातून स्वत:ला दमदार फलंदाज आणि कर्णधार म्हणून सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे विराट आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला अजिंक्यपद मिळवून देणार की न्यूझीलंड वरचढ ठरणार, हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.  

पहिला दिवस 'पाण्यात'

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस हा पावसामुळे वाया गेला. मॅच रेफरी ऑन फिल्ड अंपयार्सनी वारंवार खेळपट्टीची पाहणी केली. पीच खेळण्यासाठी योग्य आहे का, हे तपासून पाहिलं. पण पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे अखेर पहिल्या दिवसाचा खेळ पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे वाया गेला. 

दरम्यान आज दुसऱ्या दिवशी 30 मिनिटं अतिरिक्त खेळवण्यात येणार आहे. या अर्ध्या तासाची विभागणी दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात प्रत्येकी 15 मिनिटं यानुसार करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या :

WTC 2021 Final: केन विल्यमसननं जिंकला टॉस, टीम इंडियाची पहिली फलंदाजी

WTC Final 2021 साठी टीम इंडियात या युवा खेळाडूला संधी

WTC Final | 'सर' जाडेजाला महामुकाबल्यात स्पेशल कामगिरी करण्याची संधी