मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (World Test Championship Final 2021) न्यूझीलंड (New zeland) विरुद्ध टीम इंडिया (Team India) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. ही अंतिम लढत (Southmpton) साऊथम्पटनमध्ये 18-22 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (WTC Final 2021 bcci announce Team India 15 member squad against New zealand)
#TeamIndia announce their 15-member squad for the #WTC21 Final pic.twitter.com/ts9fK3j89t
— BCCI (@BCCI) June 15, 2021
कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम मॅनेजमेंटने ओपनर म्हणून मयंक अग्रवालऐवजी नव्या दमाच्या शुबमन गिलवर विश्वास दाखवला आहे. तसेच केएल राहुललाही वगळण्यात आलंय. तसेच मराठमोळ्या शार्दुल ठाकूरलाही संधी मिळाली नाही. वॉशिंग्टन सुंदर आणि फिरकी गोलंदाज अक्षर पटेललाही बाहेर ठेवण्यात आलं आहे. दरम्यान आज सकाळी न्यूझीलंडनेही या अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. त्यामुळे आता या अंतिम सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, अश्विन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
अशी आहे न्यूझीलंडची टीम
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डि ग्रँडहोम, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलकर, नील वैगनर, बीजे वाटलिंग आणि विल यंग.
संबंधित बातम्या :
ठरलं! हा दिग्गज टीम इंडियासोबत कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यावर जाणार, गांगुलीची माहिती
WTC Final 2021 | कॅप्टन विराटला 'या' दिग्गजाचे विक्रम मोडीत काढण्याची संधी