WPL लिलावात अर्जुन तेंडूलकरची गर्लफ्रेंड UNSOLD, Mumbai Indians नेही बोली लावली नाही

Arjun Tendulkar Girlfriend in WPL Auction : भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या लिलावात सर्वांत महागडी ठरली आहे. कारण तिला रॉयल चॅलेंजर बंगळूरूने 3.4 करोडमध्ये विकत घेतले आहे. या लिलावात अर्जुन तेंडूलकरची (Arjun Tendulkar) गर्लफ्रेंड अनसोल्ड ठरली आहे. एकाही संघाने तिला खरेदी करण्यात रस दाखवला नाही आहे. ही खेळाडू कोण आहे? व तिची कामगिरी काय आहे? हे जाणून घेऊयात. 

Updated: Feb 13, 2023, 08:41 PM IST
WPL लिलावात अर्जुन तेंडूलकरची गर्लफ्रेंड UNSOLD, Mumbai Indians नेही बोली लावली नाही title=

Arjun Tendulkar Girlfriend danielle wyatt in WPL Auction : भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या महिला IPL (WPL 2023 Auction) चा लिलाव आजपासून सुरू झाला. या लिलावात आतापर्यंत 34 महिला खेळाडूंना संघाने विकत घेतले आहे.  भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या लिलावात सर्वांत महागडी ठरली आहे. कारण तिला रॉयल चॅलेंजर बंगळूरूने 3.4 करोडमध्ये विकत घेतले आहे. या लिलावात अर्जुन तेंडूलकरची (Arjun Tendulkar) गर्लफ्रेंड अनसोल्ड ठरली आहे. एकाही संघाने तिला खरेदी करण्यात रस दाखवला नाही आहे. ही खेळाडू कोण आहे? व तिची कामगिरी काय आहे? हे जाणून घेऊयात. (wpl auction 2023 arjun tendulkar girl friend daniel watt unsold in auction mumbai indian also did not bid)

कोण आहे महिला खेळाडू? 

इंग्लिश क्रिकेटपटू डॅनियल व्याटचे (Danielle wyatt)नाव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबत (Arjun Tendulkar)अनेकदा जोडले गेले होते. अनेकवेळा अर्जुन इंग्लंडमध्ये डॅनियल सोबत जेवताना किंवा पार्टी करताना कॅमेरात स्पॉट झाला होता.या संदर्भातले फोटो देखील व्हायरल झाले होते. या फोटोनंतर ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सूरू झाली होती. 

WPLमध्ये अनसोल्ड

महिला प्रीमियर लीग 2023 (WPL 2023) लिलावात इंग्लंडची क्रिकेटपटू डॅनिएल व्याटचे (Danielle wyatt)ज्यावेळेस नाव आले तेव्हा एकाही संघाने तिच्यावर बोली लावली. तिची मुळ किंमत 50 लाख रुपये होती. मात्र व्हीपीएलच्या कोणत्याही संघाने डॅनियल व्याटला विकत घेण्यासाठी रस दाखवला नव्हता. त्यामुळे ती अनसोल्ड राहीली आहे. 

कामगिरी

विशेष म्हणजे डॅनियल व्याट (Danielle wyatt) ही इंग्लंडमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तिने आतापर्यंत इंग्लंडसाठी 102 एकदिवसीय आणि 138 टी-20 सामने खेळले आहेत आणि यादरम्यान तिने अनुक्रमे 1776 आणि 2249 धावा केल्या आहेत.तर गोलंदाजीत तिने वनडेमध्ये 27 आणि टी-20मध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान महिला प्रीमियर लीग 2023 (WPL 2023) लिलावात सहभागी झालेल्या 448 खेळाडूंपैकी फक्त 90  खेळाडूच भाग्यवान असतील. या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत सर्व फ्रँचायझींकडे 90 खेळाडूंवर खर्च करण्यासाठी 60 कोटी रुपये आहेत. यातील अनेक संघानी बक्कळ पैसा चांगल्या खेळाडूंवर आधीच खर्च केला आहे.त्यामुळे आता त्यांना इतर खेळाडू खरेदी करण्यासाठी काटकसर करावी लागणार आहे.