Deepti Sharma : इंडियन प्रीमियर लीग (IPL) पूर्वी क्रिकेट प्रेमींचं मनोरंजन करण्यासाठी 4 मार्चपासून वुमेन प्रीमियर लीग (WPL) ची सुरुवात होणार आहे. यामध्ये सर्व म्हणजेच 5 फ्रेंचायझींनी ऑक्शनच्या सहाय्याने आपली टीम स्ट्राँग करून घेतली आहे. यामध्ये एक नाव आहे ते म्हणजे, यूपी वॉरियर्स (UP Warriors) चं. या टीमने 5 विदेशी खेळांडूवर विश्वास दाखवला असून त्यापैकी एका खेळाडूची कर्णधारपदी निवड केली आहे.
यूपी वॉरियर्स ( UP Warriors ) साठी कर्णधारपदाच्या शर्यतीत युपीची भारतीय खेळाडू दिप्ती शर्मा हिचं नाव फार चर्चेत होतं. मात्र फ्रेंचायझीने एका अनुभवी आणि परदेशी खेळाडूवर हा विश्वास दाखवला आहे. ऑस्ट्रेलियाची एलिसा हीली (Alyssa Healy) ही या स्पर्धेमध्ये यूपीच्या टीमची कमान सांभाळणार आहे. युपी वॉरियर्सने (UP Warriors) तिला 2.6 कोटी रूपयांना आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतलं होतं.
युपी वॉरियर्सचे मालक राजेश शर्मा यांनी सांगितलं की, एलिसा या खेळाची दिग्गज आहे. शिवाय तिच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आम्हाला आशा आहे की, तिच्या नेतृत्वाखाली यूपी वॉरियर्स या महत्त्वपूर्ण प्रवासामध्ये पुढे जाईल. हा प्रवास यूपीच्या महिलांसाठी आनंद आणि प्रेरणादायी असणार आहे.
वॉरियर्सद्वारे जाहीर केलेल्या विधानात एलिसा म्हणाली, "ही एक अशी स्पर्धा आहे ज्याची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय. यूपी वॉरियर्सकडे एक उत्कृष्ट टीम आहे आणि आम्ही दाणादाण उडवण्यासाठी तयार आहोत. आमच्याकडे क्षमतांसोबतच अनुभव आणि तरुणाईचं हे एक चांगलं मिश्रण आहे. आम्ही आमच्या चाहत्यांसाठी एक शो ठेवण्यास उत्सुक आहोत."
दीप्ती शर्मा, सोफी एकलेस्टन, ताहिला मॅक्ग्रा, देविका वैद्य, शबनम इस्माइल, ग्रेस हॅरिस, एलिसा हीली, अंजलि शर्वनी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सहरावत, किरन नवगिरा, लॉरेन बेल, पार्शवी चोपड़ा, एस यशसरी, लक्ष्मी यादव, सिमरन शेख