टीम इंडिया- इंग्लंड कसोटीआधी या स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

टीम इंडिया विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. इयोन मॉर्गनने (Eoin Morgan Retirment) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Jun 28, 2022, 07:52 PM IST
टीम इंडिया- इंग्लंड कसोटीआधी या स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती title=

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (England vs India 5th Test) यांच्यात 1 जुलैपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार इयोन मॉर्गनने (Eoin Morgan Retirment) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इऑन मॉर्गनने 16 वर्षांच्या कारकिर्दीत एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा केल्या. (world cup winning england captain eoin morgan announces his international retirement)

पहिल्यांदा वर्ल्ड कप चॅम्पियन

मॉर्गनने आपल्या नेतृत्वात इंग्लंड टीमचं नशीब पालटलं. इयॉनने 2019 मध्ये आपल्या कॅप्टन्सीत पहिल्यांदाच इंग्लंडसाठी 50 षटकांचा विश्वचषक जिंकून दिला. इयॉनने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात आयर्लंड क्रिकेट संघाकडून केली होती. मात्र त्यानंतर  इयॉन इंग्लंड क्रिकेट संघात सामील झाला.

आयर्लंडकडून 2006 मध्ये पदार्पण

मॉर्गनने 2006 मध्ये आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र मॉर्गनने 3 वर्षांनी 2009 मध्ये इंग्लंडकडून खेळण्याची सुरुवात केली. मॉर्गनने 248 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 हजार 701 धावा केल्या. तर 115 टी 20 मॅचेसमध्ये  2 हजार 458 रन्स केल्या. तसेच 16 कसोटींमध्ये ही त्याने इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं.

पुढचा कॅप्टन कोण? 

मॉर्गनला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करायचं होतं. मात्र दीड वर्षातील कामगिरी आणि फिटनेस पाहता मॉर्गनने आपला निर्णय बदलला.

दरम्यान मॉर्गननंतर आता उपकर्णधार असलेल्या जॉस बटलरची वनडे आणि टी 20 संघाच्या  कर्णधारपदी वर्णी लागू शकते.