अर्जुन तेंडुलकरसोबत 'ही' महिला क्रिकेटर गेली डेटवर, यापूर्वी कोहलीला केला होता प्रपोज

अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एकच चर्चा रंगली आहे.

Updated: Jun 28, 2022, 04:43 PM IST
अर्जुन तेंडुलकरसोबत 'ही' महिला क्रिकेटर गेली डेटवर, यापूर्वी कोहलीला केला होता प्रपोज title=

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये सुट्ट्या घालवत आहे. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एकच चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण अर्जुन तेंडुलकर एका महिला क्रिकेटरसोबत एका हॉटेलमध्ये दिसला. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील खेळाडू डॅनिएल वेटने अर्जुन तेंडुलकरचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. अर्जुन तेंडुलकर लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये डॅनियल वेटसोबत लंच डेटवर गेल्याचे यात दिसत आहे.

डॅनियल वेट आणि अर्जुन तेंडुलकर यांची मैत्री खूप जुनी आहे. याआधीही या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डॅनियल वेट आणि अर्जुन तेंडुलकर यांनी लंडनमधील सोहो रेस्टॉरंटमध्ये जेवण केले.

 

2014 मध्ये डॅनियल वेटचे नाव टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबतही जोडले गेले होते. डॅनियल वेटने 2014 मध्ये विराट कोहलीला ट्विटरवर लग्नासाठी प्रपोज केले होते.

 

डॅनियल वेटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने आतापर्यंत इंग्लंडसाठी एकूण 93 वनडे आणि 124 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. डॅनियल वेटच्या खात्यात 1489 एकदिवसीय आणि 1966 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. डॅनियल वेटने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. दुसरीकडे, अर्जुन गेल्या दोन आयपीएल पर्वापासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. इंडियन प्रीमियर लीगचा पुढचा सीझन अर्जुनसाठी खास असेल असे मानले जात आहे.