'ज्यांना क्रिकेट कळत नाही त्यांच्यासाठी...'; विराटला Selfish म्हणणाऱ्यांना श्रीकांत यांनी झापलं

World Cup Ind vs Ban Virat Kohli Is Selfish: विराट कोहलीने शतक झळकावण्यासाठी अनेकदा 1 आणि 2 धावांची संधी असताना धावाच काढल्या नाहीत. त्यामुळेच या सामन्यानंतर सेलफीश हा शब्द सामन्यानंतर ट्रेण्ड होत होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 20, 2023, 12:22 PM IST
'ज्यांना क्रिकेट कळत नाही त्यांच्यासाठी...'; विराटला Selfish म्हणणाऱ्यांना श्रीकांत यांनी झापलं title=
विराट कोहलीने या सामन्यात झळकावलं शतक

World Cup Ind vs Ban Virat Kohli Is Selfish: पुण्यामध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये भारताने बांगलादेशवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यामधील भारताच्या विजयापेक्षा विराट कोहलीने झळकावलेला 48 वं शतकच सर्वाधिक चर्चेच ठरलं. कारण हे शतक विराटने अगदी सामन्यातील शेवटच्या चेंडूवर आपलं शतक अगदी नियोजनपूर्वक पद्धतीने साजरं केलं. एकाच चेंडूवर भारताचा विजय आणि विराटचं शतक असा दुग्धशर्करा योग जुळून आला. मात्र विराटच्या या खेळीवरुन तो स्वार्थी असल्याची टीकाही केली जात आहे. या सामन्यानंतर सेलफीश म्हणजेच स्वार्थी हा शब्द सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र विराट कोहलीला स्वार्थी म्हणणाऱ्यांना माजी क्रिकेटपटू कृष्णामाचारी श्रीकांत यांनी झापलं आहे.

दोघांनी मॅनेज केलं विराटचं शतक

भारतीय संघाने 257 धावांचं टार्गेच 41.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारत आणि बांगलादेशसामन्यामध्ये  सामन्यामध्ये एकवेळ परिस्थिती अशी आली होती, जेव्हा संघाच्या विजयासाठी आणि विराट कोहलीला ( Virat Kohli ) विजयासाठी 19 रन्सची आवश्यकता होती. यावेळेस विराट आणि के. एल. राहुलमध्ये चर्चा झाली. त्यानंतर केएल राहुल सामना संपेपर्यंत नॉन स्ट्राईकर एण्डलाच होता. यानंतर कोहलीने पुढच्या 15 बॉल्समध्ये भारतीय संघाला जिंकून दिलं. 2 वेळा विराट आणि के. एल. राहुलने अगदी काही अंतरावर चेंडू गेल्यानंतरही 2 धावा काढल्या. अगदी टीम इंडिया जिंकेपर्यंत विराटच स्ट्राइकवर राहिला. विराट आणि के. एल. राहुलने सामन्यातील आवश्यक धावा आणि विराटच्या शतकाचं गणित अगदी परफेक्ट जुळवलं. यासाठी अनेकदा बऱ्याच दूर चेंडू गेल्यानंतरही दोघांनी एक-एक धावा घेणं टाळलं.

नक्की वाचा >> अम्पायरला वेड्यात काढणाऱ्यांनो Wide चा 'हा' नियम तुम्हाला तरी माहितीये का?

विराटनेही दिलं स्पष्टीकरण

या दोघांनी परस्पर विचाराने केलेल्या या पार्टनरशीपवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अनेकांनी विराट कोहलीला स्वार्थी म्हटलं आहे. सेल्फीश हा शब्दही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विराटने अशापद्धतीने शतकासाठी खेळायला हवं होतं की नाही यावरुन वाद सुरु आहे. विराटने स्वत: याबद्दल सामानावीर पुरस्कार पटकावल्यानंतर प्रतिक्रिया नोंदवली. मी मागील अनेक सामन्यांमध्ये चांगलं खेळत होतो पण शतक झळकावता येत नव्हतं. म्हणून मी शतक झळकावण्यावर ठाम होतो, असं विराटने सांगितलं. 

नक्की पाहा >> विराटचं 48 वं शतक, 9 विक्रम अन् अनुष्काची Insta Story... सूर्यकुमारची तर मराठीत पोस्ट

कृष्णामाचारी श्रीकांत संतापले

विराटवर होत असलेल्या या टिकेवरुन कृष्णामाचारी श्रीकांत यांना कठोर शब्दांमध्ये सुनावलं आहे. ट्वीटरवरुन कृष्णामाचारी श्रीकांत यांनी, "विराटने काय चुकीचं केलं? ज्यांना क्रिकेटचं ज्ञान नाही (कळत नाही) त्यांच्यासाठी सांगतोय की वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणं फार मोठी गोष्ट असते. विराट कोहली या यशासाठी पात्र आहे. पुढेही त्याला असेच यश मिळत रहावो. के. एल. राहुलसारख्या संघाचा विचार करणाऱ्या खेळाडूचंही फार कौतुक. खरं तर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकवायला हवं होतं. पण खेळ एन्जॉय कर कारण तू अजूनही ते करु शकतोस," असं कृष्णामाचारी श्रीकांत म्हणाले आहेत. 

नक्की वाचा >> विराटच्या शतकासाठी Wide नकारणाऱ्या अम्पायरचं धोनी कनेक्शन आलं समोर! वाचून व्हाल थक्क

विराटचं 78 वं शतक

विराट या शतकासहीत 48 शतकांवर पोहोचला असून सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमापासून केवळ एक शतक दूर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व फॉरमॅटमधील शतकांचा विचार केल्यास विराटचं बांगलादेशविरुद्धचं शतक हे 78 वं शतक ठरलं.