World Cup Shubman Gill Health Update: नुकत्याच सुरु झालेल्या क्रिकेटच्या एकदिवसीय (ODI World Cup-2023) विश्वचषकामध्ये सध्या एक एक संघ त्यांच्या परिनं साखळी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करताना दिसत आहेत. काही नव्या संघांनी क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधलेलं असतानाच भारतही या स्पर्धेत एक अनुभली आणि जेतेपदाचा प्रबळ दावेदार असणारा संघ म्हणून तयारी करताना दिसत आहे.
8 ऑक्टोबरला Team India चा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार असून, त्याआधीच संघाला काही धक्के बसले आहेत. यामधील सर्वात मोठा धक्का म्हणजे संघातील सलामीवीर शुभमन गिलला झालेली डेंग्यूची लागण. शुभमन खेळणार की नाही? त्याच्या जागी कोणाला स्थान मिळणार? हे असेल प्रश्नही अनेकांना पडत आहेत. त्यातच या खेळाडूची Health Update समोर आली आहे.
वर्ल्ड कप सामन्यांपूर्वीच गिल (Shubman Gill) डेंग्यूच्या विळख्यात आला आणि त्याला ज्वर असल्याचं आता सांगितण्यात येत आहे. ज्यामुळं सहाजिकत ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्य़ात तो खेळणार की नाही याबाबत अद्यापही साशंकता आहे. पण, संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या राहुल गांधी यांचं वक्तव्य लक्षपूर्वकरित्या ऐकल्यास चित्र अधिक स्पष्ट होत आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी संवाद साधताना द्रविड म्हणाले, 'सामना सुरु होण्यास अद्याप 72 तासांचा कालावधी आहे. त्यामुळं आम्ही त्याची शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू. सध्या त्याच्याबद्दल कोणतंही वक्तव्य करता येणार नाही. पण, वैद्यकीय पथक त्याच्यावर नजर ठेवून आहे. आम्ही आशा करतो की सामन्याच्या आधी तो पूर्ण बरा होईल'.
वर्ल्ड कपमधील हा सामना फक्त शुभमन गिलच्या क्रिकेट कारकिर्दीसाठीच नव्हे, तर भारतीय क्रिकेट संघासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. भारतीय संघानं 1983 आणि 2011 मध्ये या स्पर्धेत जेतेपद पटकावलं. आता तब्बल 12 वर्षांनंतर संघाकडे पुन्हा तेच स्थान मिळवण्याची संधी आहे. एकिकडे ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असला तरीही 2015 नंतर मात्र त्यांच्या वाट्याला जेतेपद नाही. तेव्हा आता प्रचंड आशांसह मैदानात येणाऱ्या ऑस्ट्रेलियावर team india मात करणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
Australia विरोधात भारताचा संभाव्य संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन.