Virat Kohli Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरु आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना सुरु आहे. टीम इंडिया आपला तिसरा वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीत आहे तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जेतेपद मिळविण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. अंतिम सामन्याआधी माजी क्रिकेटर आणि वर्ल्ड कप 2011 च्या विजेता टीमचा हिस्सा असलेल्या सुरेश रैनाने मोठी भविष्यवाणी केली आहे.
एका प्रश्नाचे उत्तर देताना सुरेश रैनाने सांगितले की, विराट कोहली हा मोठ्या मॅचसाठी बनलेला खेळाडू आहे. त्याने मोठ्या सामन्यांमध्ये नेहमीच चांगले प्रदर्शन केले आहे. आपण सेमीफायनलमध्ये त्याचे 50 वे वनडे शतक पाहिले. आता फायनलमध्ये आपण त्याचे 51 वे शतक पाहू शकता, असे रैना म्हणाले.
तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध रन्स बनणे ही कोहलीची जमेची बाजू आहे. वनडेमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतक झळकावले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की कोहली याची पुनरावृत्ती करेल, असे रैनाने सांगितले.
मोहम्मद शमी जबरदस्त बॉलर आहे. त्याचे स्वींग, सीम, पोजिशन सर्वच शानदार असल्याचे रैनाने सांगितले.
क्रिकेटप्रेमींना डिजिटल स्क्रीनवर हा सोहळा पाहता येईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनलचे विनामूल्य थेट प्रवाह Disney+Hotstar ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे . डिस्नीचे प्रीमियम वापरकर्ते वेबसाइट आणि अॅप दोन्हीवर HD स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे विश्वचषक 2023 चे प्रसारण हक्क आहेत आणि फायनल स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी हिंदी, स्टार गोल्ड SD, SS1 तमिळ SD+HD, SS1 तेलुगु SD+HD, स्टार माँ गोल, SS1 वर प्रसारित केली जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरुन या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.