वसीम जाफरने अवघ्या 4 शब्दात उडवली कांगारुंची खिल्ली; Meme बरोबर कॅप्शनही चर्चेत

World Cup 2023 Wasim Jaffer Post On Aus vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा सामन्यामध्ये वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 13, 2023, 11:12 AM IST
वसीम जाफरने अवघ्या 4 शब्दात उडवली कांगारुंची खिल्ली; Meme बरोबर कॅप्शनही चर्चेत title=
वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव

World Cup 2023 Wasim Jaffer Post On Aus vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील 10 वा सामना अगदीच एकतर्फी ठरला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारखे दादा संघ आमने-सामने आल्यानंतर सामना रंजक होईल ही चाहत्यांची आशा फोल ठरली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 134 धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी सरस ठरली. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने गोलंदाजी, फलंदाजीबरोबरच श्रेत्ररक्षणमध्येही फारच सुमार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन संघ हा त्यांच्या फिल्डींगसाठी ओळखला जातो. मात्र गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने तब्बल 6 कॅच सोडले. दक्षिण आफ्रिकन फंलादाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसं काढली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने ऑस्ट्रेलिय फलंदाजांना घाम फोडल्याने ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं. ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी पाहून अनेक चाहते गोंधळून गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरनेही ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवली आहे.

सामन्यामध्ये घडलं काय?

वर्ल्डकपमधील 10 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने आपल्या नियोजित 50 ओव्हरमध्ये 311 धावांपर्यंत मजल मारली. क्विंटन डिकॉकने खणखणीत शतक झळकावत संघाला 300+ धावांचा टप्पा गाठण्यासात मोलाची भर घातली. 312 धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियन संघाला पूर्ण 50 ओव्हरही खेळून काढता आल्या नाहीत. 55 चेंडू शिल्लक असतानाच 41 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा 10 वा फलंदाज बाद झाला तेव्हा स्कोअर 177 वर होता. रबाडाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना घाम फोडला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 134 धावांनी जिंकला. वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया 10 संघांच्या यादीमध्ये थेट नवव्या स्थानी फेकला गेला आहे तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

वसीम जाफर नेमकं काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी पाहून अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वसीम जाफरनेही एक मजेदार मीम शेअर करत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रोल केलं आहे. सामना संपल्यानंतर वसीम जाफरने मुन्नाई भाई एमबीबीएस चित्रपटामधील एक मिम शेअर केलं आहे. यामध्ये मुन्नाईभाईची आई म्हणजेच मोहिनी हट्टगंडी त्याला तू मुन्नाही है ना? असा प्रश्न विचारतो तोच डायलॉग बदलून तू ऑस्ट्रेलिया है ना असं विचारताना दिसत आहे. मुन्ना म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ असून त्याची आई म्हणजे क्रिकेट चाहते असल्याचं कॅप्शन वसीमने या फोटोला दिलं आहे.

दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमाकांवर

या विजयासहीत दक्षिण आफ्रिकेने पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ थेट नवव्या स्थानावर फेकला गेला आहे. भारतीय संघाचाही एका क्रमाने घसरण झाली असून तिसऱ्या स्थानावर टीम इंडिया पोहोचली आहे.