'तेरे नाम से ही मुझको दुनियावाले...'; शमीने 7 विकेट्स घेतल्यानंतर पत्नी हसीन जहाँने पोस्ट केला Video

Mohammed Shami Wife Hasin Jahan Video: मोहम्मद शमी हा वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला असून एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 16, 2023, 04:37 PM IST
'तेरे नाम से ही मुझको दुनियावाले...'; शमीने 7 विकेट्स घेतल्यानंतर पत्नी हसीन जहाँने पोस्ट केला Video title=
ओडीआयमध्ये सात विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला मोहम्मद शमी

Mohammed Shami Wife Hasin Jahan Video: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. शामीने भारताला सेमी-फायलन जिंकवून देण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायनलमध्ये एकूण 7 विकेट्स घेतल्या. शमीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 3 वेळा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. भारत हा वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार मानला जाण्यामागे मोहम्मद शमीची गोलंदाजी महत्त्वाचा घटक मानला जात आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 विकेट्स घेण्याची किमया करणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला आहे. एकीकडे मोहम्मद शमीच्या कामगिरीची चर्चा असतानाच दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाँने पोस्ट केलेला इन्स्टाग्राम रिल चर्चेचा विषय ठरतोय.

पत्नीबरोबर कायदेशीर वाद

शमीचं प्रोफेशनल लाईफ जितकं भन्नाट सुरु आहे त्या उलट त्याच्या खासगी आयुष्यामध्ये गोंधळ सुरु आहे. मोहम्मद शामी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ या दोघांमध्ये झालेला वाद हा जगजाहीर आहे. दोघांमध्येही मागील बऱ्याच काळापासून वाद सुरु आहे. दोघांमध्ये सध्या कायदेशीर वाद सुरु आहे मात्र या दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. मात्र दोघेही एकत्र न राहता वेगवेगळे राहतात. शमीने 7 विकेट्स घेऊन भारताला फायनलमध्ये पोहचवल्यानंतर त्याच्या पत्नीने पोस्ट केलेला एक रिल तिच्या मनातील भावना व्यक्त करत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. तर काहींनी या रिलवरुन हसीन जहाँला ट्रोल केलं आहे.

पत्नीने पोस्ट केला व्हिडीओ

हसीन जहाँने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. एका गाण्यावर लिप्सिंग करताना हसीन जहाँने स्वत:चा हा फिल्मी व्हिडीओ पोस्ट केला आहे. या रिलला 'केवळ प्रेम' अशी कॅप्शन हसीन जहाँने दिली आहे. 'तेरे नाम से ही मुझको दुनिया वाले जानेंगे. तेरी सूरत देखकर ही लोग मुझे पहचानेंगे,' या गाण्यावर हसीन जहाँने रिल केला आहे. या रिलच्या माध्यमातून तिने शमीच्या चाहत्यांना डिवचलं आहे अशीही चर्चा सोशल मीडियावर आहे.

शमीच्या चाहत्यांनी घेतली शाळा

शमीच्या चाहत्यांनी हसीन जहाँला ट्रोल केलं आहे. 'ज्याच्यामागे बायकोचा ताण नसतो तो फार वेगात बॉल फेकतो. उदारहण हवं तर मोहम्मद शमीलाच पाहा,' असं एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने हसीन जहाँने वापरलेल्या गाण्यावरुन खरोखरच गुगलवर तुझी ओळख शमीची बायको अशीच दाखवली जात असल्याचा टोला लगावला आहे. अन्य एकाने 'तुला आता पच्छाताप होत असेल ना?' असा प्रश्न हसीन जहाँला विचारला आहे. अन्य एकाने, 'ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी' हे गाणं योग्य वाटेल असं म्हटलं आहे.