World Cup 2023 Prize Money: वर्ल्डकप आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडियाने आता थेट फायनलमध्ये धडक मारलीये. अशातच आता आयसीसीने वर्ल्डकपच्या प्राईज मनीची घोषणा केली आहे. यासाठी एकूण 4 मिलियन डॉलर्सचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे. भारतीय करंसीनुसार, ही किंमत 84 कोटी रूपये इतकी आहे.
आयसीसी फायनलच्या विजेत्या टीमसोबतच पराभूत टीम मालामाल होणार आहे. यावेळी वर्ल्डकप विजेत्या टीमला 4 दशलक्ष डॉलर्स मिळतील. 4 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय 33 कोटी रुपये. याशिवाय अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या टीमला 2 दशलक्ष डॉलर्स मिळतील. तसंच सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन्ही टीम्सना प्रत्येकी 8 लाख डॉलर्स मिळतील. ग्रुप स्टेजनंतर बाहेर पडलेल्या टीम्सना प्रत्येकी 1-1 लाख डॉलर्स मिळू शकणार आहे. गट टप्प्यातील सामने जिंकणाऱ्या टीमना 40 हजार डॉलर्स मिळतील.
जर आपण टीम इंडियाबद्दल बोललो तर ती सेमीफायनलमध्ये पोहोचलीये. त्याने ग्रुप स्टेजचे 9 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. यानुसार, त्याला प्रत्येक सामन्यासाठी 40 हजार डॉलर्स मिळतील. त्याचबरोबर उपांत्य फेरी गाठल्यानंतरही मोठी रक्कम निश्चित झाली आहे. न्यूझीलंडबद्दल बोलायचे झाले तर त्याने ग्रुप स्टेजमध्ये 5 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 7 सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियानेही 7 सामने जिंकले आहेत. या चार संघांना करोडो रुपये मिळणार आहेत.
वर्ल्डकपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड भिडले होते. या सेमीफायनलच्या विजयाने टीम इंडियाने थेट फायनल गाठली आहे. टीम इंडियाने ग्रुप स्टेजचे 9 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. यानुसार, त्याला प्रत्येक सामन्यासाठी 40 हजार डॉलर्स मिळतील. त्याचबरोबर उपांत्य फेरी गाठल्यानंतरही मोठी रक्कम निश्चित झालीये.
दुसरीकडे ग्रुप स्टेजमध्ये 5 सामने जिंकले आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिकेने 7 सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियानेही 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या टीम्स देखील मालामाल होणार आहेत.
सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 397 रन्सची खेळी केली. यावेळी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी अनुक्रमे 117 आणि 105 रन्सची खेळी केली. याशिवाय शुभमन गिल याने 80 रन्सची महत्त्वाची खेळी केली. टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर मात्र, पारडं पालटलं. कॅप्टन केन आणि डॅरिल मिशेल यांनी संयमी खेळी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून रोहितने शमीला गोलंदाजी दिली आणि त्याने देखील कॅप्टनला निराश केलं नाही. अखेरीस 70 रन्सने टीम इंडियाचा विजय झाला.