न्यूझीलंडविरुद्ध अशी आहे भारताची Playing XI! सूर्याची संघात एन्ट्री तर शार्दुलच्या जागी...

World Cup 2023 India vs New Zealand Playing XI: भारतीय संघामध्ये 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच 2 खेळाडूंना अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 22, 2023, 01:55 PM IST
न्यूझीलंडविरुद्ध अशी आहे भारताची Playing XI! सूर्याची संघात एन्ट्री तर शार्दुलच्या जागी... title=
भारताने टॉस जिंकला

World Cup 2023 India vs New Zealand Playing XI: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील 21 व्या सामन्याचा टॉस भारताने जिंकला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना धरमशाला येथे खेळवण्यात येत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने संघामध्ये 2 प्रमुख बदल करण्यात आल्याचं सांगितलं आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पहिल्यांदाच 2 नव्या खेळाडूंचा या स्पर्धेतील प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

कोणाला संघात स्थान? कोणाला डच्चू?

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या जायबंदी झाल्याने तो न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नाही हे स्पष्ट झालं होतं. त्यातच भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज ईशान किशनला मधमाश्यांनी चावा घेतल्याने तो सामन्याच्या एक दिवस आधीच संभाव्य प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर पडला. त्यामुळेच भारताने या सामन्यामध्ये स्फोटक फलंदाज आणि मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं आहे. त्याप्रमाणे भारताने शार्दुल ठाकूरऐवजी संघामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला संधी दिली आहे. बाकी भारतीय संघ जैसे थे आहे.  

अशी आहे भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार)
शुभमन गिल
विराट कोहली
श्रेयस अय्यर
के. एल. राहुल (विकेटकीपर)
सूर्यकुमार यादव
रविंद्र जडेजा
जसप्रीत बुमराह
युजवेंद्र चहल
मोहम्मद शामी
मोहम्मद सिराज

भारत विरुद्ध न्यूझीलंड रेकॉर्ड कसा?

भारत आणि न्यूझीलंडने एकमेकांविरोधात एकूण 116 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यपैकी भारताने 58 सामने जिंकले असून 50 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. यापैकी 7 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही तर 1 सामना अनिर्णित राहिला. या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना पराभवाचा धक्का बसला आहे. गेल्या 20 वर्षांपासून वर्ल्ड कप मॅचेसमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत जिंकलेला नाही. हा सामना जिंकून टीम इंडियाला केवळ विजयाचा दुष्काळ संपवायचा नाही तर 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभवाचा बदलाही घ्यायचा आहे.

पॉइण्ट्स टेबलमध्ये दोन्ही संघांची स्थिती काय?

पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी न्यूझीलंडचा संघ आहे. दोन्ही संघांनी आपआपले चारही सामने जिंकले असूनही भारत दुसऱ्या स्थानी तर न्यूझीलंड पहिल्या स्थानी आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे नेट रन रेट. भारताचा नेट रन रेट +1.659 इतका आहे. तर न्यूझीलंडचा नेट रन रेट +1.923 इतका आहे. त्यामुळेच न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अव्वल स्थानी असेल.