World Cup 2023 : 'माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून...', संघर्षाचे दिवस आठवत हॅरिस रौफला भावना अनावर!

ICC ODI World Cup 2023 :  हॅरिस रौफ (Haris Rauf) तसा खमका बॉलर, बिकट परिस्थितीत कोणत्या लाईन आणि लेंथला बॉल टाकायचं हे त्याला अचूक माहितीये. भलेभले खेळाडू देखील हॅरिसपासून टकरून असतात.

Updated: Oct 2, 2023, 11:01 PM IST
World Cup 2023 : 'माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून...', संघर्षाचे दिवस आठवत हॅरिस रौफला भावना अनावर! title=
Haris Rauf get emotional

Haris Rauf Success Story : तोंडावर आलेल्या वर्ल्ड कपसाठी आता पाकिस्तानचा संघ (Pakistan Cricket Team) भारतात आला आहे. भारतात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पाकिस्तानचा संघ यंदा मोठ्या तयारीने वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023) भारतात आलाय. पाकिस्तानचा पेस अटॅक भारताला अडचणीत आणू शकतो. टीम इंडियाला सर्वात जास्त धोका आहे, तो हॅरिस रौफ याच्यापासून... हॅरिस रौफने (Haris Rauf) आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय खेळाडूंना अनेकदा अडचणीत आणलंय. हॅरिस रौफ तसा खमका बॉलर, बिकट परिस्थितीत कोणत्या लाईन आणि लेंथला बॉल टाकायचं हे त्याला अचूक माहितीये. भलेभले खेळाडू देखील हॅरिसपासून टकरून असतात. मात्र, तुम्हाला हॅरिसच्या संघर्षाबद्दल माहितीये का? हॅरिस रॉफ सारखा खेळाडू तयार होणं, ही सामान्य गोष्ट नाही. हॅरिसने त्याच्या आयुष्याच्या आठवणींना एका मुलाखतीत उजाळा दिलाय. 

काय म्हणाला Haris Rauf ?

दहावीनंतर शाळेची फी भरावी म्हणून मी रविवारी बाजारात स्नॅकस विकायचो. उरलेला आठवडा मी शाळेत आणि अकादमीत जायचो. माझ्या बालवयात मला संघर्ष करावा लागला. जेव्हा मी विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा माझ्या वडिलांचं उत्पन्न कमी होतं. माझी फी भरण्यासाठी ते पुरेसी नव्हती. मलाही फी परवडत नव्हती, पण मी टेप-बॉल क्रिकेट खेळू लागल्यानंतर फी भरण्यासाठी परिस्थिती योग्य बनली, असं हॅरिस रौफ म्हणतो.

पाकिस्तानात टेप-बॉल क्रिकेट खेळणारी मुले महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये सहज कमावतात. इतकं कमावायचं आणि आईला द्यायचं, पण या कमाईबद्दल मी वडिलांना कधीच सांगितलं नाही. संघर्षाच्या दिवसांत जागेअभावी मी आणि माझं कुटुंब स्वयंपाकघरात झोपायचो, असंही हॅरिस रौफ सांगतो.

आणखी वाचा - World Cup 2023 : हॅरिस रौफला का वाटते किंग कोहलीची भीती? स्वत:च सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!

दरम्यान, असे दिवस माझ्या कुटुंबाने पाहिले आहेत. रौफने सांगितलं की, माझ्या वडिलांना तीन भाऊ असून ते सर्व एकत्र राहतात. माझ्या वडिलांची मोठी खोली आहे. माझ्या काकांचे लग्न झाल्यावर त्यांनी त्यांची खोली भावांना दिली. शेवटी अशी परिस्थिती उद्भवली जेव्हा आम्ही त्यावेळी स्वयंपाकघरात झोपलो होतो. त्यामुळे आम्हाला राहण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, परिस्थिती हळूहळू बदलत गेली, असंही हॅरिस रौफने सांगितलं