'नुसता खात असतो' म्हणणाऱ्याला ट्रोलरवर संतापून सूर्यकुमार म्हणाला, 'मला ऑर्डर...'

Suryakumar Yadav : सोशल मीडियावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सूर्यकुमार यादव डगआउटमध्ये बसून काहीतरी खाताना दिसत आहेत. लोकांनी या व्हिडीओवरुन त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 16, 2023, 03:36 PM IST
'नुसता खात असतो' म्हणणाऱ्याला ट्रोलरवर संतापून सूर्यकुमार म्हणाला, 'मला ऑर्डर...' title=

Suryakumar Yadav Viral Video : टी 20 क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) विश्वचषक स्पर्धेसाठी (World Cup 2023) अद्यापही प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठीही त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र या सामन्यावेळी सूर्यकुमार यादव जबरदस्त चर्चेत आला होता. बेंचवर बसून खाण्याचा आनंद घेत असलेल्या सूर्यकुमार यादवला एका कॅमेरामनने पकडले होते. सूर्यकुमारला कॅमेरा पाहताच त्याने अशी प्रतिक्रिया दिली जी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

सूर्यकुमार यादव मैदानावर जितकी आक्रमक आणि आक्रमक फलंदाजी करतो, तितकीच धम्माल-मस्ती तो मैदानाबाहेरही करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत होता. ज्यामध्ये तो डगआउटमध्ये बसून काहीतरी खाताना दिसत होता. पण कॅमेरा पाहिल्यानंतर सूर्यकुमार एकाच जागी थांबला आणि कोणतीच हालचाल करत नव्हता. यावेळी त्याच्यासोबत श्रेयस अय्यर, बुमराह, हार्दिक आणि इशान किशनसह काही खेळाडू दिसत होते.

सूर्यकुमारचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने सूर्याची खिल्ली उडवली होती. सूर्याचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या युजरने, "सर, तुम्ही डगआऊटमध्ये बसून खात आहात, मैदानावर जा आणि दोन-चार षटकार मारा," अशी कमेंट केली होती. त्यावर आता सूर्यकुमार यादवने प्रत्युत्तर दिलं आहे.

चाहत्याच्या या कमेंटवर सूर्याने प्रतिक्रिया दिली आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं. "मला ऑर्डर देऊ नको, स्विगीला दे भाऊ," असा रिप्लाय सूर्याने दिला आहे. सूर्याचे चाहत्याला दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूर्याच्या या कमेंटवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, विश्वचषक 2023 मध्ये भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामने भारतीय संघानेच जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना भारताने जिंकला, तर अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. याशिवाय भारताने विश्वचषकातील पाकिस्तानलाही नमवलं आहे. आता भारतीय संघ 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात तरी सूर्यकुमारला मैदानावर उतरण्याची संधी मिळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विश्वचषक फायनल 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.