World Cup 2019 : रोहित आऊट की नॉट आऊट? नेटकरी संतापले

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा १८ रन करुन आऊट झाला.

Updated: Jun 27, 2019, 10:58 PM IST
World Cup 2019 : रोहित आऊट की नॉट आऊट? नेटकरी संतापले title=

मँचेस्टर : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा १८ रन करुन आऊट झाला. रोहितला अंपायरनी दिलेल्या निर्णयावरुन सोशल मीडियावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

रोहित शर्माने २३ बॉलमध्ये १८ रनसोबतच चांगली सुरुवात झाली होती. केमार रोच वेस्ट इंडिजची ६वी ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या ६व्या बॉलवर रोहितने मारलेला शॉट विकेट कीपरच्या हातात गेला. यानंतर वेस्ट इंडिजच्या टीमने अपील केलं. अंपायरने नॉट आऊट दिल्यानंतर वेस्ट इंडिजने रिव्ह्यू घेतला.

या रिव्हिव्यूमध्ये अल्ट्रा एजच्या साहय्याने पाहण्यात आलं. पण यात देखील रोहितच्या बॅटला कट लागल्याचे ठळकपणे स्पष्ट होत नव्हते. तरी देखील  रोहितला आऊट का देण्यात आले, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. रोहित शर्माची बायको रितिकाही या मॅचसाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिनेही या निर्णयानंतर नाराजी व्यक्त केली. 

लक्ष्मण-बिशोप यांचं समर्थन ?

व्हीव्हीएस लक्ष्मण आणि इयन बिशॉप यांनी कॉमेंट्री दरम्यान या निर्णयावर चर्चा केली. हा निर्णय संशयास्पद असल्याचे ते म्हणाले. संशयास्पद परिस्थितीत बेनिफिट ऑफ डाउट हा बॅट्समनला दिला जातो, त्यामुळे रोहितला नॉट आऊट दिलं पाहिजे होतं, असं मत लक्ष्मण आणि बिशप यांनी व्यक्त केलं. याचबरोबर संजय मांजरेकर, हरभजन सिंग, पार्थिव पटेल, इरफान पठाण यांनीही रोहित आऊट नव्हता, अशा प्रतिक्रिया दिल्या.