नॉटिंगहम : नॅथन कुल्टर नाईलची फटकेबाजी आणि स्टिव्ह स्मिथच्या संयमी खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं विंडिजपुढे सन्मानजनक स्कोअर उभारला आहे. ऑस्ट्रेलियाचा ४९ ओव्हरमध्ये २८८ रनवर ऑल आऊट झाला. वर्ल्ड कपच्या या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या बॉलरनी हा निर्णय योग्य ठरवला आणि सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. ऑस्ट्रेलियाची अवस्था एकावेळी ३८/४ आणि ७९/५ अशी होती, पण स्टिव्ह स्मिथ एका बाजूने किल्ला लढवत होता.
स्मिथने एलेक्स कारे आणि नॅथन कुल्टर नाईलसोबत महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या नॅथन कुल्टर नाईलने ६० बॉलमध्ये ९२ रन केले. यामध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. स्टिव्हन स्मिथने १०३ बॉलमध्ये संयमी ७३ रन केले. तर एलेक्स कारे ४५ रन करून आऊट झाला.
वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रॅथवेटने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर ओशेन थॉमस, शेल्डन कॉट्रेल आणि आंद्रे रसेलला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. जेसन होल्डरला एक विकेट घेण्यात यश आलं.
p>