World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचआधी 'मौका-मौका'ची 'फादर्स डे स्पेशल' जाहिरात

यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यांचंच लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचवर लागलं आहे.

Updated: Jun 11, 2019, 08:31 PM IST
World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचआधी 'मौका-मौका'ची 'फादर्स डे स्पेशल' जाहिरात title=

मुंबई :  यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यांचंच लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचवर लागलं आहे. रविवारी १६ जूनला हा सामना रंगणार आहे. भारत-पाकिस्तान मॅच म्हणलं की 'मौका-मौका'ची जाहिरात नेहमीचीच आहे. यावेळीही वर्ल्ड कपच्या मॅचचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीने 'मौका-मौका'ची नवीन जाहिरात बनवली आहे. 

भारत-पाकिस्तानची मॅच ज्या दिवशी होणार आहे त्याचदिवशी म्हणजेच १६ जूनला फादर्स डे आहे. या फादर्स डेचं औचित्य साधून मौका-मौकाची ही जाहिरात बनवण्यात आली आहे. या जाहिरातीत एक जण पाकिस्तानची जर्सी घालून, एक जण बांगलादेशची जर्सी घालून आणि एक जण टीम इंडियाची जर्सी घालून दाखवण्यात आला आहे. 

आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपमध्ये ६ सामने खेळवले गेले आहेत. यातल्या सगळ्या ६ सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानचे सामने झाले.