मॅनचेस्टर : वर्ल्ड कप २०१९ च्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिले बॉलिंग करत असलेल्या टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मॅचच्या पहिल्याच बॉलला टीम इंडियाने त्यांचा डीआरएस रिव्ह्यू गमावला.
भुवनेश्वर कुमारने या मॅचची पहिली ओव्हर टाकली. भुवनेश्वर कुमारने टाकलेला पहिलाच बॉल मार्टिन गप्टीलच्या पायाला लागला. ऍक्रॉस द लाईन खेळत असताना मार्टिन गप्टीलचा अंदाज चुकला. यामुळे भारतीय खेळाडूंनी अपील केलं, पण अंपायरनी नॉट आऊट दिलं. यानंतर कर्णधार विराट कोहलीने धोनी आणि भुवनेश्वर कुमारशी चर्चा केली. धोनीने सांगितल्यानंतर विराटने डीआरएस घेतला.
रिप्लेमध्ये भुवनेश्वर कुमारने टाकलेला बॉल लेग स्टम्पच्या बाहेर जाताना दिसत होता. त्यामुळे भारताने पहिल्याच बॉलला डीआरएस गमावला. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भारताने मॅचच्या पहिल्याच बॉलवर डीआरएस गमावला आहे.