'जादूगार' विराट कोहली; आयसीसीकडून कौतुक

टीम इंडिया वर्ल्ड कपमधली आपली पहिलीच मॅच खेळत असताना आयसीसीने विराट कोहलीला स्पेशल गिफ्ट दिलं आहे.

Updated: Jun 5, 2019, 08:24 PM IST
'जादूगार' विराट कोहली; आयसीसीकडून कौतुक title=

साऊथम्पटन : टीम इंडिया वर्ल्ड कपमधली आपली पहिलीच मॅच खेळत असताना आयसीसीने विराट कोहलीला स्पेशल गिफ्ट दिलं आहे. विराट कोहलीसाठी आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. 

आयसीसीने कोहलीचा हॅरी पॉटरच्या रुपातला फोटो शेअर केला आहे. तर कोहलीचा राजाच्या रुपातला दुसरा फोटो आयसीसीने ट्विट केला आहे. राजाच्या रुपात असलेल्या फोटोमध्ये कोहलीच्या एका हातात बॅट तर दुसऱ्या हातामध्ये बॉल पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये कोहलीच्या डोक्यावर मुकूट घातलेला आहे. 

आयसीसीने देखील आपल्या ट्विटद्वारे विराटला क्रिकेटमधील जादूगार म्हणून सादर केले आहे. त्याच्या डोक्यावर एक निशाण पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये विराटने हॅरी पॉटर सारखा चष्मा देखील घातला आहे.

याआधी माध्यमांसोबत बोलताना विराट म्हणाला की, वर्ल्ड कप स्पर्धेची जबाबदारी ही इतर स्पर्धांच्या तुलनेत वेगळी आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत.

वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका एकूण ४ वेळा भिडले आहेत. त्यापैकी ३ वेळा दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला आहे. तर १ वेळ टीम इंडियाने विजय मिळवला आहे.