ICC World Cup 2023 : भारतात पाच ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. गेल्या पंधरा दिवसात 17 सामने खेळवण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांचे किमान तीन सामने खेळवण्यात आले आहेत. जसजशी स्पर्धा पुढे सरकतेय तसतशी चुरस वाढत चालली आहे. या दरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोटी बातमी समोर आली आहे. प्रीमिअर लीगमधल्या (Premier League) मुंबई, दिल्ली, गुजरात या संघाने अनेक खेळाडूंना रिलीज केलं आहे. यात सर्वाधिक गुजरात संघाने 11 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना रिलीज केलं आहे.
फ्रँचाईजने केली खेळाडूंची यादी जाहीर
भारतात गेल्या वर्षापासून वुमन्स प्रीमिअर लीगला (Womens Premier League) सुरुवात झाली असून दुसऱ्या हंमामाची तयारी सुरुवात झालीय. वुमन्स प्रीमिअर लीगमधल्या (WPL) सर्व पाच फ्रँचाईजने रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पाच फ्रँचाईजने एकूण 60 खेळाडूंना रिटेन केलं आहे. यात 21 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर 29 खेळाडूंना रिलीज केलं आहे. अनेक मोठ्या खेळाडूंना फ्रँचाईजने रिलीज केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर 2022 पासून वुमन्स प्रीमिअर लीगला सुरुवात करण्यात आली. यात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, यूपी वॉरिअर्स आणि गुजरात जायंट्स या संघांचा समावेश करण्यात आला. पहिल्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावलं.
मुंबईने या खेळाडूंना केलं बाहेर
गतविजेत्या मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवलाय. यात हेदर ग्राहमचाही समावेश आहे याशिवाय धारा गुज्जर, सोनम यादव, नीलम बिष्ट या खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या हंगामात सर्वाधिक धावा करत पर्पल कॅप जिंकणाऱ्या हॅले मॅथ्यूज इमरजिंग प्लेअर यास्तिका भाटिया आणि कर्णधार हरमनप्रीत कौरला फ्रँचाईजीने संघात कायम ठेवलं आहे.
रिटेन खेळाडू- हॅले मॅथ्यूज, यास्तिका भाटिया, नताली सीवर,एमेलिया कर, इसाबेल वॉन्ग, शोले ट्रॉयन, पूजा वस्त्राकर,साइका इशाक, अमनजोत कौर, जिंटीमानी कालिटा, हुमैरा काजी, प्रियंका बाला
रिलीज खेळाडू- हेदर ग्राहम, धारा गुज्जर,सोनम यादव, नीलम बिष्ट
दिल्ली कॅपिटल्सचा संघ
दिल्ली कॅपिटल फ्रँचाईजने कर्णधार मेग लेनिंगला संघात कायम ठेवलं आहे. दिल्ली कॅपिटल पहिल्या हंगामात उपविजेता संघ होता. धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्मालाही संघात रिटने करण्यात आलाय.
रिटेन खेळाडू: एलीसे कैप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमा रोड्रिग्स, जेस जोनासन, लॉरा हैरिस, मारिजाने कॅप, मिन्नू मानी, पूनम यादव, राधा यादव, शेफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ति, तानिया भाटिया, टिटास साधू,
रिलीज खेळाडू: अपर्णा मोंडल, जासिया अख्तर, तारा नौरिस
गुजरातने अकरा खेळाडूंना केलं बाहेर
गुजरात जायंट्ससंघाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. याचे परिणाम पाहिला मिळालेत. गुजरात फ्रँचाईजने 11 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
रिटेन खेळाडू: एश्ले गार्डनर, बेथ मूनी, डायलान हेमलता, हरलीन देयोल, लॉरा वॉलवारड्ट, शबनम शाकिल, स्नेह राण, तनुजा कंवर.
रिलीज खेळाडू: एनाबेल सदरलँड, अश्वनी कुमारी, जॉर्जिया वारेहम,हर्ले गला, किम गॅरथ, मानसी जोशी, मोनिका पटेल,पारूनिका सिसोदिया, शाबिनेनी मेघना, सोफी डंकली, सुषमा वर्मा.
आरसीबीनेही घेतला मोठा निर्णय
आरसीबीनेही मोठा निर्मय घेतला असून तीन परदेशी खेळाडूंना संघातून बाहेर केलं आहे.
रिटेन खेळाडू: आशा शोभना, दिशा कसाटा, एलिसा पेरी, हेदर नाइट, इंद्रानी रॉय, कनिका आहूजा, रेणुका सिंह, ऋचा घोष, श्रेयांका पाटिल, स्मृति मांधना, सोफी डिवाइन
रिलीज खेळाडू : डेन वान निकर्क, एरीन बर्न्स, कोमल जांजड, मेगन शूट,पनूम खेमा, प्रीति बोस, शाना पवार
युपी वॉरिअर्सने चार खेळाडू केले रिलीज
युपी वॉरिअर्सनेही चार खेळाडूंना रिलीज केलं आहे.
रिटेन खेळाडू : एलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ति शर्मा, ग्रेस हैरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, प्रशस्वी चोपड़ा,राजेश्वरी गायकवाड़, एस यशाश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टन, ताहिला मॅक्ग्रा.
रिलीज खेळाडू : देविका वैद्य, शबनिम इस्माइल, शिवाली शिंदे, सिमरन शेख