नवी दिल्ली : महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या स्मृती मानधना हिने शानदार शतक लगावत भारताला वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवून दिला. या शतकानंतर स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे.
वेस्ट इंडिज विरोधात स्मृतीने नाबाद १०६ धावा केल्या. स्मृती सर्वात कमी वयात भारताकडून वर्ल्ड कपमध्ये शतक लगावणारी पहिली भारतीय ठरली आहे. स्मृतीचे २० वर्ष आणि ३४६ दिवस इतके वय आहे.
वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक लगावण्याच्या यादी मानधना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
स्मृतीने १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०८ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारी ती चौथी भारतीय ठरली आहे. यापूर्वी हरमनप्रीतने इंग्लड विरूद्ध २०१३ च्या वर्ल्ड कपमध्ये नाबाद १०७ धावा केल्या होत्या. मिताली राजने याच वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरूद्ध १०३ धावांची नाबाद खेळी केली होती. तर टी कामिनी हिने याच वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध १०० धावांची खेळी केली होती.