मुंबई : IPL 2022साठी 8 टीम्सने अखेर त्यांच्या रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर केली आहे. मात्र या दरम्यान, केएल राहुल आणि राशीद खान मोठ्या वादात अडकण्याची शक्यता दिसतेय. बीसीसीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. चौकशीमधून काही आढळल्यास या दोन्ही खेळाडूंना टी-20 लीगमध्ये खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते.
केएल राहुल आणि राशिद खान यांचा जुन्या फ्रँचायझीसोबत 30 नोव्हेंबरपर्यंत करार होता. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडू इतर फ्रँचायझी संघांच्या संपर्कात आहेत, तर हे नियमाविरुद्ध आहे.
लखनऊ संघाने दोन्ही खेळाडूंशी संपर्क साधला असल्याची माहिती आहे. त्यांना लखनऊच्या संघात सामील होण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. राहुलला लखनौच्या टीमकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. तर राशिद खानला 16 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जने बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. बीसीसीआय त्याची चौकशी करतेय.
जुन्या आठ संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंना अंतिम रूप दिल्यानंतर, लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझींना 1 ते 25 डिसेंबर दरम्यान 3 खेळाडू निवडण्याची संधी मिळेल, त्यानंतर जानेवारीमध्ये लिलाव होणार आहे.