WI vs Eng 2nd Test | Ben Stokesची ऐतिहासिक कामगिरी, ठरला 5 वा ऑलराऊंडर

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना  (West Indies vs England, 2nd Test) खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stocks) शानदार शतकी खेळी केली.  

Updated: Mar 18, 2022, 09:03 PM IST
WI vs Eng 2nd Test | Ben Stokesची ऐतिहासिक कामगिरी, ठरला 5 वा ऑलराऊंडर title=
छाया सौजन्य : आयसीसी

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना  (West Indies vs England, 2nd Test) खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stocks) शानदार शतकी खेळी केली. स्टोक्सने 128 चेंडूत एकूण 120 धावांची  खेळी केली. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 6 खणखणीत सिक्स ठोकले. स्टोक्ससह कॅप्टन जो रुटनेही खणखणीत शतक ठोकलं. रुटने 153 धावा केल्या. (wi vs eng 2nd test england all rounder ben stokes scored century against west indies at kensington oval bridgetown barbados) 

स्टोक्सचं शतक, 5 हजार धावा पूर्ण

लंच ब्रेकनंतर जो रूट आऊट झाला आणि बेअरस्टोही 20 धावा करून तंबूत परतला. स्टोक्सनेही शानदार सिक्स ठोकत टेस्ट क्रिकेटमधील आपल्या 5 हजार धावा पूर्ण केल्या. 

स्टोक्स यासह टेस्टमध्ये 150 हून अधिक विकेट्स आणि 5 हजार धावा करणारा जगातील केवळ पाचवा खेळाडू ठरला.विशेष म्हणजे स्टोक्स अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा दुसरा आणि एकूण 5 वा ऑलराऊंडर ठरला.