1996च्या इंग्लंड दौऱ्यावर का रागावले होते सिद्धू?; दौरा सोडून भारतात परतले होते

सिद्धूने आपल्या टीमच्या 'कॅप्टन'वर रागावून हा दौरा अर्ध्यावरच सोडला आणि कोणालाही काहीही सांगितलं नाही.

Updated: Sep 30, 2021, 09:38 AM IST
1996च्या इंग्लंड दौऱ्यावर का रागावले होते सिद्धू?; दौरा सोडून भारतात परतले होते title=

मुंबई : क्रिकेट पीच असो किंवा राजकारण नवज्योत सिंग सिद्धू यांचं नाव नेहमीच अग्रस्थानी पहायला मिळालं. यामध्ये अनेकदा त्यांचा बंडखोरपणाही पहायला मिळला. दरम्यान क्रिकेटमध्ये देखील त्यांच्या या वृत्तीची झलक दिसून आली होती. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली होती त्यावेळी भारतासमोर ते कठीण आव्हान होतं. त्यावेळी सिद्धूने आपल्या टीमच्या 'कॅप्टन'वर रागावून हा दौरा अर्ध्यावरच सोडला आणि कोणालाही काहीही सांगितलं नाही.

नेमकं काय झालं होतं त्या दौऱ्यावर?

टीम इंडिया 1996मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी टीमला तीन कसोटी सामने खेळायचे होते आणि उर्वरित सामने बोर्ड टीमशी खेळायचे होते. टीम इंडियाचं नेतृत्व भारताकडून मोहम्मद अझरुद्दीन करत होते आणि इंग्लंडसाठी मायकल एथरटन टीमची कमान सांभाळत होते. या दौऱ्यात नवज्योतसिंग सिद्धूही टीम इंडियासोबत होते आणि सलामीवीर म्हणून संघाचा भाग होता.

पहिला कसोटी सामना एजबॅस्टन मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये नवज्योतसिंग सिद्धूला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. टीमच्या कॉम्बिनेशनमुळे हे झालं, पण या सामन्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू कोणालाही काहीही न बोलता इंग्लंडहून भारतात परतला. सर्वांना आश्चर्य वाटलं, काय झालं आणि सिद्धूने हे नेमकं का केलं?

नवज्योतसिंग सिद्धू कोणालाही काही सांगत नव्हते. पण या दौऱ्याच्या मध्यावर, बीसीसीआयने नंतर त्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, ज्यामध्ये काही गोष्टी शोधल्या जाऊ शकतात.

का नाराज झालेले सिद्धू?

बीसीसीआय सचिव जयवंत लेले यांनी त्यांचं पुस्तक "I was There - Memoirs of a Cricket Administrator" ही संपूर्ण कहाणी नमूद केलीये. ज्यावरून उघड झालं की, नवजोत सिंह सिद्धू या दौऱ्यात कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर नाराज होते. 

पुस्तकानुसार, “नवज्योत सिंग सिद्धू नाराज होते की मोहम्मद अझरुद्दीन त्याच्याशी सर्वांसमोर नीट बोलत नाहीत आणि अपशब्द वापरतात. प्रकरण मोठं झाल्याने कोणालाही काहीही न बोलता नवज्योतसिंग सिद्धू दौऱ्यावरून परत आले.

त्याच पुस्तकात असंही लिहिलं आहे की, जेव्हा बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली, तेव्हा त्यात राजसिंग डुंगरपूर, आयएस बिंद्रा, सुनील गावस्कर आणि स्वतः जयवंत लेले यांचा समावेश होता. नवज्योतसिंग सिद्धू या समितीसमोरही काही बोलले नव्हते.

मोहिंदर अमरनाथ यांना सांगितलं होतं कारण

तर समितीने इंग्लंडहून परतलेल्या टीमच्या इतर सदस्यांशी चर्चा केली, त्यानंतर काही वेळाने समितीमध्ये पंजाबी भाषिक साथीदाराचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला जेणेकरून सिद्धू मिसळू शकतील. मग मोहिंदर अमरनाथ यांना समितीचा भाग बनवण्यात आलं आणि त्यानंतरच सगळं काही घडलं.

एक दिवस नवज्योतसिंग सिद्धूने समितीसमोर काहीही बोलण्यास नकार दिला, तेव्हा मोहिंदर अमरनाथ सिद्धूशी एकांतात बोलले. त्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूने सांगितलं होतं की, त्याला संघात 'शिवीगाळ' करण्यात आली होती, जी त्याला सहन होत नव्हती. जेव्हा मोहिंदर अमरनाथने त्याला विचारलं की, अझहरच्या कोणत्या गैरवर्तनाने तो अस्वस्थ झाला. त्यावेळी सिद्धूचं उत्तर ऐकून तेही हसले.

मोहिंदर अमरनाथ यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना समजावून सांगितलं की, उत्तर भारतात जरी ते अपमानास्पद असलं तरी हैदराबादच्या स्थानिक भाषेत ते इतकं वाईट मानलं जात नाही. मोहिंदर अमरनाथने ही संपूर्ण कहाणी समितीला सांगितली आणि ही घटना विसरण्यास सांगितले.