लग्नाची अंगठी गळ्यात घालून फिरतोय चीकू

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या इटलीमधील लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे विराटच्या चेहऱ्यावरील हसू. प्रेयसीला जीवनसाथी बनवल्यानंतर विराट चांगलाच खुश आहे. या प्रेमात त्याने अनोख असं काही केलंय.

Updated: Jan 4, 2018, 03:44 PM IST
लग्नाची अंगठी गळ्यात घालून फिरतोय चीकू  title=

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या इटलीमधील लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे विराटच्या चेहऱ्यावरील हसू. प्रेयसीला जीवनसाथी बनवल्यानंतर विराट चांगलाच खुश आहे. या प्रेमात त्याने अनोख असं काही केलंय.

विराटचे सैराट प्रेम

या आनंदात त्याने चक्क लग्नातील अंगठी गळ्यात घातलीये. हे आम्ही म्हणत नाही आहोत तर याचा पुरावाही आहे. 

विराट सध्या द. आफ्रिका दौऱ्यावर आहेत. या ट्रिपमध्ये अनुष्का शर्माही त्याच्यासोबत आहे. द. आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी, ६ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.

विराटच्या फॅन क्लबवर केपटाऊनमधील काही फोटोज इंटरनेटवर व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये विराट एका फॅन्ससह दिसतोय. या फोटोत विराटच्या गळ्यात अंगठी पाहायला मिळतेय.

गळ्यात अंगठी घालून फिरतोय विराट

बॉम्बे टाईम्सच्या वृत्तानुसार, एका सूत्राने अशी माहिती दिलीये की, विराट जेव्हा  सराव करतो तेव्हा तो आपली अंगठी गळ्यात घालतो. फलंदाजी करताना खेळाडूंना ग्लव्हज घालावे लागतात. त्यामुळे अनेक फलंदाज बोटांमध्ये काही घालत नाहीत. मात्र विराटला त्या अंगठीला आपल्यापासून एक क्षणही दूर जाऊ द्यायची नाहीये म्हणूनच त्याने ही अंगठी गळ्यात घातलीये. विराटचे हे प्रेम पाहून अनेक मुली नव्याने त्याच्या प्रेमात पडतील.

anushka sharma virat kohli

टीम इंडियाचे अनेक खेळाडू आपल्या कुटुंबासोबत द. आफ्रिकेत आहेत. भारताचा पहिला कसोटी सामना ५ जानेवारीपासून सुरु होतोय.