टी-20 वर्ल्डकपसाठी Yuzvendra Chahal का दाखवला बाहेरचा रस्ता?

बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यावेळी स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहलला संघात स्थान का दिलं गेलं नव्हतं. 

Updated: Oct 17, 2021, 07:51 AM IST
टी-20 वर्ल्डकपसाठी Yuzvendra Chahal का दाखवला बाहेरचा रस्ता? title=

दुबई : युएई आणि ओमानमध्ये आजपासून टी -20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होतेय. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तान टीमशी होणार आहे. गेल्या महिन्यात जेव्हा बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यावेळी स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहलला संघात स्थान का दिलं गेलं नव्हतं. यावरून अनेकांनी टीकाही केली. पण आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

का ठेवलं चहलला बाहेर?

भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितलं की, युझवेंद्र चहल सारख्या खेळाडूला टी -20 विश्वचषक संघाबाहेर ठेवणं हा एक कठीण निर्णय होता, पण युएईमध्ये धीम्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करताना त्याच्या राहुल चहरची निवड करण्यात आलं. 

आयपीएलच्या या मोसमात राजस्थानच्या चहरने मुंबई इंडियन्ससाठी 11 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर चहलने 15 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आणि हर्षल पटेल (32 विकेट) नंतर त्याने आरसीबीसाठी सर्वोत्तम कामगिरी केली.

टी -20 विश्वचषकापूर्वी पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला, "हा एक आव्हानात्मक निर्णय होता पण आम्ही राहुल चहरला निवडलं. कारण त्याने गेल्या सीझनमध्ये चमकदार गोलंदाजी केली. तो वेगाने गोलंदाजी करतो."

कोहली म्हणाला, "आम्हाला विश्वास आहे की स्पर्धेत विकेट काढेल. अशा स्थितीत, वेगवान गोलंदाजी करणारे संथ गोलंदाज फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतील. राहुल हा असा गोलंदाज आहे जो विकेट घेण्याच्या कलेत पारंगत आहे. चहलला बाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण असला तरी वर्ल्ड कप संघात संख्या मर्यादित आहे आणि प्रत्येकाला जागा मिळू शकत नाही."