सुनिल गावस्कर यांनीच का दिली श्रेयस अय्यरला डेब्यू कॅप?

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी श्रेयस अय्यरकडे भारताची कसोटी कॅप सोपवली आणि त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित केलं.

Updated: Nov 25, 2021, 12:50 PM IST
सुनिल गावस्कर यांनीच का दिली श्रेयस अय्यरला डेब्यू कॅप? title=

कानपूर : गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला टीम इंडियाच्या वतीने पदार्पणाची संधी मिळाली. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी श्रेयस अय्यरकडे भारताची कसोटी कॅप सोपवली आणि त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित केलं. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा अय्यर हा 303 वा खेळाडू ठरला.

गावस्कर यांनी अय्यरला टेस्ट कॅप का दिली?

टीम इंडियामध्ये काही काळ फक्त कर्णधार, वरिष्ठ खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफचे सदस्य पदार्पण करणाऱ्या खेळाडूला कसोटी कॅप देत असत. पण राहुल द्रविड प्रशिक्षक बनताच, त्याने भारतीय क्रिकेटमधील जुनी परंपरा पुन्हा सुरु केली. या परंपरेत जेव्हा क्रिकेटचं दिग्गज नवीन खेळाडूंना कसोटी कॅप्स देत असत.

समोर आलं कारण

न्यूझीलंडविरुद्ध टॉस करण्यापूर्वी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी त्याला कॅप दिली. या खास कार्यक्रमासाठी द्रविडने गावस्कर यांना आमंत्रित केलं होतं. यापूर्वी T20 मालिकेदरम्यान, द्रविडने अजित आगरकरला हर्षल पटेल यास T20 संघाची कॅप देण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंकडून राष्ट्रीय कॅप घेण्याची परंपरा आहे. यापूर्वी भारतातही अशी परंपरा होती, परंतु काही काळासाठी फक्त कर्णधार किंवा वरिष्ठ खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफचा सदस्य पदार्पण करणाऱ्याला कॅप देत होते.