...म्हणून धोनी फक्त 15 सेकंद ट्रॉफी हातात ठेवतो

ट्रॉफी दुसऱ्याला देऊन का लगेच बाजुला होऊन जातो धोनी...

Updated: Jul 9, 2018, 05:08 PM IST
...म्हणून धोनी फक्त 15 सेकंद ट्रॉफी हातात ठेवतो title=

मुंबई : टीम इंडिया माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी शनिवारी 37 वर्षांचा झाला. टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात टी20 सीरीज जिंकत त्याला बर्थडे गिफ्ट देखील दिलं. धोनी कर्णधार असतांना विजयानंतर मिळालेली ट्रॉफी तो कधीच जास्त वेळ आपल्या हातात ठेवत नाही. ट्रॉफी हातात येताच तो ती इतर खेळाडूंच्या हातात देऊन टाकतो. स्टार स्पोर्ट्सच्या एका इंटरव्यूमध्ये धोनीने म्हटलं की, सगळ्यात मोठं आव्हान काही खेळाडूंचा अहम न दुखवता त्यांचा कॉमन सेंस विकसित करण्याचं होतं. धोनीने स्विकार केलं की, क्रिकेटमध्ये कॉमन सेंस सारखी कोणती गोष्ट नसते. एक कर्णधार म्हणून इतर खेळाडूंमधली दरी कशी कमी करता येईल हे आव्हान असतं.

धोनी आता समोर नाही येत... का?

आता एक असा ट्रेंड झाला आहे की, धोनी येतो आणि ट्रॉफी घेताच ती दुसऱ्या खेळाडूंच्या हातात देऊन कोपऱ्याला निघून जातो. असं का? हा प्रश्न विचारल्यानंतर धोनीने म्हटलं की, तुम्हाला नाही वाटत का की मॅच तर संपूर्ण टीम जिंकते आणि ट्रॉफी फक्त कर्णधार हातात घेतो. हा एक प्रकारचा ओवर एक्पोजर असतो. तुम्हाला हा एक्पोजर आधीच भेटलेला असतो. जवऴपास 15 सेकेंडचा... त्यानंतर मला नाही वाटत की, तुमची तेथे गरज असते. सगळ्याना सेलिब्रेशन करणं आवडतं. तुम्ही त्याचा भाग आहात आणि असं नाही की तुम्हाला त्या ट्रॉफीसोबतच राहायचं आहे. यामुळे मी म्हणतो की, जेवढं शक्य आहे तेवढी गोष्ट सरळ करण्याचा प्रयत्न असतो. आणि 15 सेकेंडचा एक्पोजर झाला तर मग ट्रॉफीला चिपकून राहण्यात काहीच अर्थ नसतो. सोबतच असं पण होतं की, तुम्ही जेव्हा फक्त ट्रॉफीसोबत 15 सेंकडच घालवतात. ज्यामुळे पुन्हा ते 15 सेकेंड मिळवण्यासाठी एक आणखी ट्रॉफी मिळवण्य़ाचा तुमचा प्रयत्न असतो.