महाराष्ट्र केसरीची फायनल कोण मारणार? अवघ्या महाराष्ट्राचं कुस्तीच्या आखाड्याकडे लक्ष!

महाराष्ट्र केसरीची गदा कोण उंचावणार, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख आणि गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात होणार जंगी लढत.

Updated: Jan 14, 2023, 05:22 PM IST
महाराष्ट्र केसरीची फायनल कोण मारणार? अवघ्या महाराष्ट्राचं कुस्तीच्या आखाड्याकडे लक्ष! title=

Maharashtra Kesari Final 2023  : महाराष्ट्र केसरीचा फायनल सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. चार पैलवान महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्यासाठी आखाड्यात एकमेकांना भिडणार आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक चित्तथरारक आणि प्रेक्षनीय कुस्त्या पाहायला मिळाल्या. अखेर माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख आणि गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांनी धडक मारली आहे. (Who will beat the final of Maharashtra Kesari 2023 latest marathi news)

'महाराष्ट्र केसरी'च्या विजेत्याला रोख 5 लाखांचे बक्षीस, थार गाडी आणि  उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. 18 वजन गटातील विजेत्यांना 18 जावा कंपनीच्या गाड्या विजेत्यांना देण्यात येणार आहेत.