Maharashtra Kesari Kusti 2023 sikandar sheikh : पुण्यात सूरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची (Maharashtra Kesari Kusti 2023) चुरस आणखीण वाढली आहे. या स्पर्धेत वाशिमचा मल्ल असलेल्या सिकंदर शेखनं (sikandar sheikh) माजी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखला (Bala Rafiq Sheikh) आस्मान दाखवत खुल्या गटातून माती विभागातील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता खुल्या गटातून माती विभागातील फायनल लढत सिकंदर शेख (sikandar sheikh)आणि महेंद्र गायकवाड या पैलवानांमध्ये रंगणार आहे. या लढतीत जिंकलेला पैलवान अंतिम फेरीत धडक मारणार आहे. यामध्ये सिकंदर शेख अंतिम फेरीत पोहोचेल असा दावा केला जात आहे. अशात आता सिंकदर शेखचा कुस्तीतला खडतर प्रवास जाणून घेऊयात.
सिकंदरचे (sikandar sheikh)वडिल रशिद शेख हे देखील एक पैलवान होते. तालमीत सरावाला असतानात तालमीची स्वच्छता करायचे आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचे. असं सर्व सुरू असताना अचानक वडिलांची प्रकृती अचानच बिघडली. त्यामुळे त्यांनी लग्नगाठ बांधली. आणि पुढे जाऊन त्यांना हूसेन आणि सिकंदर (sikandar sheikh) ही दोन मुले झाली. मात्र नंतर कुस्तीतील मिळणाऱ्या बक्षीसाच्या रक्कमेवर चार जणांचे पोट भागेनासे झाले होते.त्यामुळे मग त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा पर्याय निवडला. दिवसभर हमाली करायचे आणि नंतर उरलेल्या वेळात लहान मुलाला घेऊन आखाड्यात जायचे.
सिकंदरच्या (sikandar sheikh)वडिलांना आजारपणाने गाठले आणि त्यांची हमाली सुटली. त्यामुळे खुराकाला लागणाऱ्या पैशाची चणचण भासू लागली होती. त्यामुळे या समस्येवर पर्याय म्हणून हूसेनने बापाच्या हमालीचे ओझे आपल्या पाठिवर घेतले. आणि सिकंदरने वडिलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवायला सुरूवात केली. वस्ताद विश्वास हारगले याच्या मार्गदर्शनात तो कुस्तीचे धडे शिकू लागला.
सिकंदरने (sikandar sheikh) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. त्याने वयाच्या पंचवीसाव्या वर्षी धडधाकड पैलवानांना आस्मान दाखवलं आहे. सध्या तो महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकत आहे. सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात देखील भरती झाला आहे. सैन्यदलाकडून खेळताना तो अनेक मैदान मारत आहे. सिकंदरने आतापर्यंत एक महिंद्रा थार, एक जॉना डिअर ट्रॅक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हिस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदीच्या गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.
दरम्यान आता सिकंदरला (sikandar sheikh) यंदाच्या महाराष्ट्र केसरी 2023 वर नाव कोरण्याची संधी आहे. आता सिकंदर महाराष्ट्र केसरीवर नाव कोरतो का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.