Kane Williamson नंतर 'या' खेळाडूकडे येणार कर्णधारपदाची धुरा?

केन मायदेशी परतल्यामुळे टीमच्या कर्णधारपदाची धुरा कोणत्या खेळाडूकडे येणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. 

Updated: May 19, 2022, 01:50 PM IST
Kane Williamson नंतर 'या' खेळाडूकडे येणार कर्णधारपदाची धुरा? title=

मुंबई : आयपीएल 2022 आता शेवटच्या टप्प्यात असताना प्लेऑफ गाठण्यासाठी चढाओढ सुरु आहे. चौथ्या क्रमांकावर कोणत्या टीमची वर्णी लागणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद असून नुकताच केन विलियम्सनच्या रूपात टीमला एक मोठा धक्का बसला आहे. या चढाओढीच्या परिस्थितीत केन मायदेशी परतल्याने प्लेऑफ गाठणं टीमसाठी कठीण जाऊ शकतं. 

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये केन विलियम्सन खेळणार नाहीये. विलियम्सन कौटुंबिक कारणामुळे आयपीएलची स्पर्धा मध्येच सोडून गेला आहे. मात्र आता केन मायदेशी परतल्यामुळे टीमच्या कर्णधारपदाची धुरा कोणत्या खेळाडूकडे येणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. यामध्ये 3 खेळाडूंची नावं चर्चेत आहेत. 

IPL 2021: Bhuvneshwar Kumar reveals plan to keep RCB's AB de Villiers in  check | Cricket News | Zee News

भुवनेश्वर कुमार

सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी भुवनेश्वर कुमारची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तो दीर्घकाळापासून सनरायझर्स टीमकडून खेळतोय. शिवाय तो टीममधील सर्व खेळाडूंना ओळखत असून तो वरिष्ठ खेळाडूंच्या संपर्कात देखील आहे. तसंच 2019 मध्ये केनच्या अनुपस्थितीत त्याने टीमचं कर्णधारपद भूषवलं होतं.

Sunrisers Hyderabad Nicholas Pooran vs Lucknow Supergiants Bad Records In  IPL | हैदराबाद ने एक झटके में बर्बाद किए 10.75 करोड़, इस खिलाड़ी को खरीदकर  की सबसे बड़ी गलती! | Hindi News

निकोलस पूरन

निकोलस पूरन हा सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज आहे. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत फ्रेंचायझी कर्णधाराचा पर्याय म्हणून कोणाची निवड करू शकते. या खेळाडूमध्ये कर्णधार करण्याची क्षमता आहे. शिवाय नुकतंच वेस्ट इंडिज टीमने त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. 

Injured Aiden Markram ruled out of remainder of England Tests | Cricket  News | Zee News

एडन मार्क्रम

केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत एडन मार्क्रम (Aiden Markram) याच्याकडेही कर्णधारपदाची धुरा जाऊ शकते. याने दक्षिण आफ्रिकेच्या टीमचं फाफच्या अनुपस्थितीत नेतृत्व केलं आहे. त्याचप्रमाणे एडन मार्कराम अंडर-19 टीमचा कर्णधार होता, त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने अंडर-19 वर्ल्डकप जिंकला होता.