मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलसाठी प्रत्येक टीम उत्साहात आहे. जगभरात चाहते असलेली मुंबई इंडियन्सच्या टीमचा पहिला सामना 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्ससोबत रंगणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या टीमकडून ओपनिंगला कोण उतरणार असा मोठा प्रश्न समोर आहे.
आयपीएलच्या गेल्या सिझनमध्ये रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक हे दोघं जणं डावाची सुरुवात करत असत. मात्र यावेळी क्विटंन मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाहीये. त्यामुळे आता रोहित शर्मासोबत कोण उतरणार हा मोठा प्रश्न समोर आहे.
यंदा मुंबई इंडियन्सच्या ओपनिंगमध्ये बदल होणार असून रोहित शर्मासोबत भारताचा धडाकेबाज फलंदाज ईशान किशन मैदानावर उतरणार आहे. ईशान किशन डाव्या हाताचा फलंदाज आहे. तर रोहित शर्मा उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्यामुळे आता हे कॉम्बिनेशन किती यशस्वी ठरतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने ईशान किशनला 15 कोटी 25 लाखांना विकत घेतलं. यापूर्वीही तो मुंबईच्याच टीममध्ये होता. आयपीएलमधील त्याचं करियर पाहिलं तर त्याने 61 सामन्यांमध्ये 1452 रन्स केले आहेत.