मुंबई : आयपीएलमधेये रविवारी, 2 मेला संध्याकाळी पजांब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना होणार आहे. अशातच पजांब किंग्जचा कर्णधार के. एल. राहुलची परिस्थिती खालावली त्यामुळे तो ही मॅच खेळणार नसल्याचे फ्रँचायझीने जाहीर केले. त्यामुळे आता पजांब किंग्जचे सुत्र कोणाच्या हातात देणार हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. परंतु नंतर प्रीती झींटाने या प्रश्नांच उत्तर ट्वीटमार्फत चाहत्यांना दिले आहे. तिने जाहीर केले की, पंजाब किंग्जचा कर्णधार के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवाल संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेणार आहे. आज रात्री दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांचा सामना होणार आहे.
रविवारी, 2 मेला संध्याकाळी फ्रँचायझीने हे निवेदन दिले होते, त्यात संघाच्या कर्णधाराच्या तब्येतीबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये म्हंटले आहे की, "केएल राहुलच्या पोटात काल रात्री तीव्र वेदना होत होत्या. औषधांचा कोणताही परिणाम न झाल्याने त्याला आपत्कालीन कक्षात नेण्यात आले, तेथे तपासणीनंतर असे आढळले की, त्याच्या पोटात अॅपेंडिसाइटिस आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय डॅाक्टरांनी सांगितला आहे. त्यामुळे त्याला सध्या रुग्णालयात भरती केले आहे आणि त्यामुळे तो आज मॅच खेळू शकणार नाही.
Go well, skip! https://t.co/Dck3qDe1I7
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 2, 2021
क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार राहुलच्या अनुपस्थितीत त्याचा सलामीचा साथीदार मयंक अग्रवाल संघाचा कार्यभार स्वीकारेल. मात्र, राहुलच्या जागी संघात कोणाचा समावेश असेल, याची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. भारतीय फलंदाज म्हणून मनदीप सिंग किंवा सरफराज खान यांना मैदानात उतरवले जाऊ शकते.