मैदानावरच खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि...

क्रिकेटपटूला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Updated: Dec 25, 2021, 03:45 PM IST
मैदानावरच खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि... title=

कराची : पाकिस्तानच्या एका क्रिकेटरला खेळत असताना अचानक छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाला. टेस्ट क्रिकेटर आबिद अली कायद-ए-आजम ट्रॉफी खेळत होता. त्रास अधिक होत असल्याने अखेर त्याच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली. सध्या त्याला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यूबीएल क्रिकेट मैदानावर खैबर पख्तुनख्वाविरुद्ध 61 धावांची खेळी करताना त्याच्या छातीत दुखू लागलं. दोन वेळा त्याला ही समस्या जाणवली. त्यानंतर क्रिकेटपटूला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आबिदला अक्युट कोरोनरी सिंड्रोम असल्याचं निदान करण्यात आलं.

पीसीबीने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, ''त्याच्या रिहॅबिलिटेशन प्रोससमध्ये आबिदने हलका वॉक घेतला यावेळी त्याला कोणता त्रास झाला नाही. पुढील आठवड्याच्या सुरुवातीला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्यांचं हॉस्पिटलमध्ये रिहैबिलिटेशन सुरू राहील."

प्रार्थना करण्यासाठी फॅन्सना आवाहन

आबिद अली म्हणाला याने सोशल मीडियावर एक व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये तो म्हणतो, "मी देवाचे आभार मानतो कारण मी चांगली कामगिरी करतोय. माझी एक छोटीशी मेडिकल प्रोसेस असल्याने तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी अशी माझी विनंती आहे."