VIDEO: तू आलास की, राम सिया राम..; के.एल राहुलच्या वक्तव्याने केशव महाराज हैराण, पाहा मैदानावर नेमकं काय घडलं

KL Rahul-Keshav Maharaj Viral Video: गुरुवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 78 रन्सने पराभव केला. मात्र यावेळी एक घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 22, 2023, 11:16 AM IST
VIDEO: तू आलास की, राम सिया राम..; के.एल राहुलच्या वक्तव्याने केशव महाराज हैराण, पाहा मैदानावर नेमकं काय घडलं title=

KL Rahul-Keshav Maharaj Viral Video: गुरुवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 78 रन्सने पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाने वनडे सिरीजवर देखील कब्जा केला आहे. संजू सॅमसनची शतकी खेळी र आणि अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने तिसरा सामना जिंकला. या सामन्यात अवघ्या 218 रन्सवर दक्षिण आफ्रिकेची टीम ऑलआऊट झाली. मात्र यावेळी एक घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. 

जेव्हा तू येतोय त्याचवेळी...

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना केशव महाराज क्रिझवर आला. जेव्हा केशव फलंदाजीसाठी आला तेव्हा स्टेडियममध्ये आदिपुरुष सिनेमातील हिट सॉन्ग 'राम सिया राम' वाजू लागलं. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार के.एल राहुल विकेटकीपिंग करत होता. त्याने हे गाणं ऐकलं आणि केशवला काहीतरी सांगितलं. या दोघांच्याही या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राहुलने केशव महाराजला म्हटलं की, जेव्हा पण तु फलंदाजीसाठी येतोय त्यावेळी हे ( राम सिया राम ) गाणं वाजू लागतं. राहुलच्या या वाक्यानंतर केशवही थोडा गोंधळतो आणि होकार देतो. हा व्हिडीओ चाहत्यांना फार आवडला असून लोकं विविध कमेंट्स देखील करतायत.

टीम इंडियाने जिंकली सिरीज

पार्लमध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध टीम इंडिया यांच्यामध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात विजय मिळवत सिरीजवर देखील कब्जा केलाय. के.एल राहुलच्या नेतृत्वाखाली 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये 2 सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश मिळालं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 296 रन्स केले. याच्या प्रत्युत्तरात 45.5 ओव्हरमध्ये अवघे 218 रन्स करू शकली. 

केएल राहुलने केला खास रेकॉर्ड

भारताच्या विजयासह केएल राहुलनेही एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केलीये. वनडे सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेला मायदेशात पराभूत करणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत करण्यात विराट कोहली एकमेव कर्णधार होता. 2018 मध्ये कोहलीने या विक्रमाला गवसणी घातली होती.