India vs Pakistan : भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील प्रत्येक सामना नेहमीच हायव्होल्टेज असतो. या दोन्ही देशातील सामने पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतूर असतात. आता आगामी कोणत्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) भिडणार आहेत, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी एका पाकिस्तानी खेळाडूने टीम इंडियाला हरवल्यानंतरचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. या किस्स्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) स्काय स्पोर्ट्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रिझवानने भारताविरूद्ध विजय मिळवल्यानंतरचा एक किस्सा सांगितला होता. या किस्स्याबाबत तो म्हणाला की, जेव्हा आम्ही भारताविरूद्ध सामना जिंकलो, तेव्हा मला वाटले की हा फक्त माझ्यासाठी सामना होता. कारण आम्ही तो सहज जिंकलो होतो. मात्र पाकिस्तानात आल्यावर कळाल की या विजयाचा एक वेगळाच अर्थ होता, असे रिझवान (Mohammad Rizwan) म्हणाला.
भारताला हरवल्यानंतर जेव्हा मी दुकानात गेलो तेव्हा ते माझ्याकडून पैसे घेत नव्हते. ते म्हणायचे, तू जा, तू जा. मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही, तुमच्यासाठी य़ेथे सगळे मोफत आहे, असे रिझवानला पाकिस्तानचे नागरीक म्हणत होते. असा विजयानंतरचा किस्सा त्याने सांगितला.
रिझवान (Mohammad Rizwan) मुलाखतीत ज्या सामन्याबाबत बोलत होता. तो टी20 वर्ल्ड कप मधला सामना होता. या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमने 152 धावांची भागिदारी करून टीम इंडियाचा 10 विकेटसने पराभव केला होता.विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 151 धावाच केल्या होत्या. रिझवान (Mohammad Rizwan) आणि बाबर (Babar Azam) जोडीने 13 ओव्हरमध्ये हे लक्ष्य सहज गाठलं होते.
गेल्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला टीम इंडियाने (Team India) यावर्षी घेतला. भारताने यंदाच्या टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. विराट कोहलीने कारकीर्दितील अविस्मरणीय खेळी करताना पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला होता. त्यामुळे हा टीम इंडियाने एक प्रकारे बदलाच घेतला आहे.
दरम्यान टीम इंडिया सध्या बांगलादेशविरूद्ध (India vs Bangladesh) टेस्ट सामना खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाने 404 धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या बांगलादेशची (Bangladesh)अवस्था खुपच वाईट आहे.