मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' या सिनेमाच्या प्रीमियरदरम्यान भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती.
यावेळी विराट कोहली आणि युवराज सिंग यांनी सचिनच्या या सिनेमाबद्दल विचारण्यात आले. दोघांनीही या सिनेमाचे तोंडभरुन कौतुक केले.
दरम्यान, विराटला त्याच्या बायोपिकबद्दलही तेथील उपस्थितांनी प्रश्न विचारला. यावेळी कोहलीने मी तर आता केवळ २८ वर्षांचा आहे असे हसत हसत उत्तर दिले आणि तो निघून गेला.