Women's T20 World Cup 2024: महिला T20 विश्वचषक 2024 ची आज अर्थात 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. यंदाच्या स्पर्धेत स्मार्ट रिप्ले सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. या सिस्टमसाठी सुमारे 28 कॅमेरे वापरले जाणार आहेत. या सिस्टीममध्ये एकदम बारकाईने डिटेल चेकिंग करता येईल. इंडियन प्रीमियर लीग आणि द हंड्रेडमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. या महिला टी-20 विश्वचषकात याचा वापर केला जाणार आहे. यामध्ये भारताचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे, जो शुक्रवारी दुबईत खेळला जाणार आहे.
स्मार्ट रिप्ले सिस्टीमबद्दल आयसीसीने सांगितले की, 'प्रत्येक सामन्यात सुमारे २८ कॅमेरे बसवले जातील. यामुळे प्रत्येक प्रकारचे विश्लेषण केले जाऊ शकते. यामध्ये बरीच सुधारणा केली जात आहे. यासोबतच सर्व सामन्यांमध्ये डिसीजन रिव्यू सिस्टमही उपलब्ध असेल. यामध्ये हॉक-आय स्मार्ट रिप्ले सिस्टीम वापरण्यात येणार आहे. ही सिस्टीम टीव्ही अंपायरला एकाच वेळी अनेक कोनातून फुटेज उपलब्ध करून देईल. यामुळेच हे योग्य निर्णय घेण्यास मदत करेल."
ही सिस्टीम वापरल्याने टीव्ही अंपायरला थेट दोन हॉक-आय ऑपरेटरकडून माहिती मिळेल. हा ऑपरेटर अंपायरसोबत एकाच खोलीत बसेल. सिस्टीम जमिनीवर बसवण्यात आलेल्या आठ आय-स्पीड कॅमेऱ्यांमधून दृश्ये टिपतील आणि अंपायरसोबत फुटेज शेअर करतील. आतापर्यंत, टीव्ही ब्रॉडकास्ट डायरेक्टर हे थर्ड अंपायर आणि हॉक-आय ऑपरेटर्समध्ये काम करायचे.
The road to #T20WorldCup greatness begins today #WhateverItTakes pic.twitter.com/eWE5LO3ziu
— T20 World Cup (@T20WorldCup) October 3, 2024
स्मार्ट रिप्ले सिस्टम स्टंपिंग रेफरलच्या बाबतीत खूप उपयुक्त ठरू शकते. टीव्ही पंच हॉक-आय ऑपरेटरकडून स्प्लिट-स्क्रीन व्हिज्युअल्स मागू शकतात. आता टीव्ही अंपायर अल्ट्रा एज विचारणार नाहीत. स्टंपिंगसाठी ते थेट साइड-ऑन रिप्ले तपासतील. हॉक-आय कॅमेरे प्रति सेकंद सुमारे 300 फ्रेम्स वेगाने रेकॉर्ड करतात. त्यामुळे आता निर्णय घेणे अधिक सोपं होणार आहे.