वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, बॅटिंग करणार

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतलाय.

Updated: Jul 2, 2017, 06:17 PM IST
वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, बॅटिंग करणार title=

अँटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतलाय.

चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आलेत. युवराज सिंगच्या ऐवजी दिनेश कार्तिक, अश्विनच्या जागी रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शामीचा संघात समावेश करण्यात आलाय.

२०१५मधील वर्ल्डकपनंतर शामी पहिली वनडे खेळणार आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघात मिगल कमिन्सच्या ऐवजी अल्झारी जोसेफचा समावेश करण्यात आलाय.