टीममधून कुठे गायब झालेत गेल, ब्राव्हो, पोलार्ड आणि नरेन

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झालीये. वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात पावसाचा खेळ राहिल्याने सामना रद्द करण्यात आला. 

Updated: Jun 24, 2017, 08:19 PM IST
टीममधून कुठे गायब झालेत गेल, ब्राव्हो, पोलार्ड आणि नरेन title=

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झालीये. वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात पावसाचा खेळ राहिल्याने सामना रद्द करण्यात आला. 

पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९.२ षटकांत १९९ धावा केल्या. पावसाने दोनदा व्यत्यय दिला. त्यामुळे पुढे खेळच होऊ शकला नाही. अखेर पावसामुळे सामना रद्द करावा लागला. 

भारताविरुद्धच्या या मालिकेत वेस्ट इंडिज संघातील अनेक चॅम्पियन्सचा सहभाग नाहीये. पहिल्या दोन सामन्यांसाठी वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंची नावे जेसन होल्डर(कर्णधार), देवेंद्र बिशु, जोनाथन कार्टर, रोस्टन चेस, मिगुल कमिन्स, शाय होप, अल्जारी जोसेफ, इविन लुईस, जेसन मोहम्मद, अॅशेल नर्स, केरन पावेल, रॉमेन पॉवेल, केसरिक विल्यम्स

मात्र या संघात ख्रिस गेल, किरेन पोलार्ड, ड्वायेन ब्रावो, सुनील नरेन, डॅरेन ब्राव्हो यांना स्थान देण्यात आलेले नाही. वेस्ट इंडिजचे हे तगडे क्रिकेटर अनफिट आहेत अथवा सीरिजमध्ये खेळू शकत नाहीत असं नाही तर आपल्या क्रिकेट बोर्डाशी सुरु असलेल्या वादामुळे हे क्रिकेटर भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाहीयेत

नव्या पॉलिसीमुळे यांची निवड झाली नाही

नव्या पॉलिसीनुसार वेस्ट इंडिज आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी त्याच खेळाडूंची निवड करतो ज्यांनी या फॉरमॅटमध्ये स्थानिक क्रिकेट सामने खेळलेत. गेल, पोलार्ड, ब्रावो तसेच नरेन हे क्रिकेटर मोठ्या प्रमाणात टी-२० लीगमध्ये दिसतात. कॅरेबियन टी-२० लीगसह जगभरातील अनेक टी-२० लीगमध्ये ते खेळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-२०लीगमध्ये हे क्रिकेटर दिसतात. 

२०१५नंततर क्रिस गेल एकही वनडे खेळलेला नाही

वनडे वर्ल्डकप २०१५मधील क्वार्टरफायनलच्या सामन्यानंतर क्रिस गेल एकही वनडे खेळलेला नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि क्रिस गेल यांच्यातील वादामुळे तो वनडे खेळलेला नाहीये.