अँटिग्वा : भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद २५२ धावा केल्या.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. भारताने पहिले दोन विकेट झटपट गमावले. ११ धावांवर धवन केला तर भारताच्या खात्यात ३४ धावा झाल्या असताना कोहली बाद झाला.
त्यानंतर युवराज आणि अजिंक्यने खेळपट्टीवर टिकून राहत संघाला शंभरी गाठून दिली. सलामीवीर अजिंक्य रहाणेने ७२ धावांची खेळी केली. तर महेंद्रसिंग धोनीने ७८ धावा तडकावल्या. केदार जाधवने ४० धावांची खेळी केली.